महाविकास आघाडीने महायुतीच्या वचननाम्याचीच नक्कल केली आहे. महाविकास आघाडीने प्रसिद्ध केलेला महाराष्ट्रनामा हा थापानामा आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली.
शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्या कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघात प्रचार रॅली काढली होती. यावेळी त्यांनी हा आरोप केला. सरकारच्या योजनेचा सर्वांनी लाभ घेतला पाहिजे. कारण हे जनतेचे पैसे आहेत, असे सांगत आम्ही जनतेचे पैसे वाटणारे आहोत, त्यांचे पैसे लाटणारे नाही, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी प्रचार रॅली दरम्यान केली. या मतदारसंघातील मतदारांनी मला निवडून दिल्याने मी राज्याचा मुख्यमंत्री झालो. विरोधक विचारायचे लाडक्या बहीण योजनेसाठी पैसे कुठून आणणार? त्यांनी या योजनेला विरोध करून बदनाम केले. ते न्यायालयातही गेले होते.
(हेही वाचा महायुतीतील घटक पक्षांना किती जागा मिळणार? Vinod Tawde यांनी दिली आकडेवारी )
या योजनेसाठी खोडा घालणाऱ्यांना मत मागायला आल्यावर जोडा दाखवा, योजना बंद करण्यासाठी न्यायालयात का गेला? याचा जाबही विचारा. लाडक्या बहिण योजनेसाठी शंभर वेळा जेलमध्ये जायची जयारी असल्याचेही ते म्हणाले. विरोधकांना निवडणुकीत खोटी आश्वासन देऊन केवळ दिशाभूल करायची आहे. आम्ही लाडक्या बहिण योजनेचे पाच हफ्ते दिले. आम्ही हफ्ते घेणारे नाही तर हफ्ते देणारे आहोत. म्हणून लाडक्या बहिणींनी आमच्यावर विश्वास ठेवला. असे सांगत विकासाच्या मारेकऱ्यांना जनता विजयी करणार नाही, असेही शेवटी शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.
Join Our WhatsApp Community