Manikrao Kokate : बारामतीत कोकाटेंच्या भाषणाने खळबळ; शरद पवार आणि अजित पवार समोरासमोर

129
Manikrao Kokate : बारामतीत कोकाटेंच्या भाषणाने खळबळ; शरद पवार आणि अजित पवार समोरासमोर
Manikrao Kokate : बारामतीत कोकाटेंच्या भाषणाने खळबळ; शरद पवार आणि अजित पवार समोरासमोर

बारामतीत ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या कृषक कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात राजकीय वातावरण तापले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, त्यांच्या कन्या आणि पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. याच कार्यक्रमात अजित पवारांचे कट्टर समर्थक व राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या भाषणाने राजकीय चर्चांना उधाण आणले. (Manikrao Kokate)

(हेही वाचा- Congress ने ७५ वर्षात १०६ वेळा केली घटनादुरूस्ती; राहुल गांधींच्या विधानावर सिंधियांचा हल्लाबोल)

कोकाटेंचे भाषण आणि ‘ती’ खपली

कोकाटे यांनी भाषणाची सुरुवात “आदरणीय शरद पवार साहेब” म्हणत केली. परंतु नंतर त्यांनी थेट अजित पवारांचा उल्लेख करत, “ज्यांच्यामुळे मला कृषिमंत्री म्हणून येथे येण्याचा मान मिळाला, ते उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार” असे सांगितले. त्यानंतर त्यांनी पहाटेच्या शपथविधीचा संदर्भ देत, “त्या वेळीही आम्ही अजितदादांच्या पाठिशी ठामपणे उभे होतो,” असे स्पष्ट केले. (Manikrao Kokate)

या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये चर्चेला उधाण आले. शरद पवार यांच्यासमोरच अजित पवारांच्या पाठिंब्याचे कौतुक करत कोकाटेंनी अप्रत्यक्षपणे पक्षातील फुटीवर भाष्य केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (Manikrao Kokate)

(हेही वाचा- Punjab मध्ये २ वर्षात ३.५ लाख शीखांचे धर्मांतर; तरनतारनमध्ये धर्मांतराची संख्या १०२ % वाढली)

शरद-अजित पुन्हा एकत्र?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर शरद पवार आणि अजित पवार यांचा एकत्र येणे हा अपवाद मानला जातो. दिल्लीतील शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजित पवार त्यांना भेटले होते. त्यानंतर आता बारामतीत कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने दोघे पुन्हा एकत्र आले. या दोघांच्या उपस्थितीने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला सुरूवात झाली. (Manikrao Kokate)

पवार कुटुंबातील राजकीय नाट्याची पुन्हा चर्चा

कोकाटेंच्या भाषणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी आणि फुटीच्या वादाची जुनी जखम पुन्हा उघडल्याचे दिसून आले. शरद पवार यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, मात्र त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. सुप्रिया सुळे यांनीही संयम बाळगल्याचे दिसले. (Manikrao Kokate)

(हेही वाचा- iPhone 16 : आयफोन १६ च्या किमती उतरल्या, आतापर्यंतच्या सगळ्यात कमी किमतीला मिळतोय हा फोन)

संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा

कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने शरद पवार, अजित पवार, आणि माणिकराव कोकाटे यांची उपस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वादळ घेऊन आली आहे. कोकाटेंच्या विधानामुळे पवार कुटुंबातील राजकीय समीकरणे, गटबाजी आणि भविष्यातील राजकीय दिशा यावर राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. (Manikrao Kokate)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.