मणिपूरचे (Manipur) मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह (N. Biren Singh) यांनी दि. ९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस, मुख्यमंत्री बिरेन सिंह (N. Biren Singh) यांनी मणिपूरमधील हिंसाचाराबद्दल जनतेची माफी मागितली होती. ते म्हणाले होते की, हे संपूर्ण वर्ष खूप वाईट गेले. गेल्या वर्षी ३ मे पासून आजपर्यंत जे काही घडले, त्याबद्दल मी राज्यातील जनतेची माफी मागतो. अनेकांनी त्यांचे प्रियजन गमावले. अनेक लोक आपली घरे सोडून गेले. मला याबद्दल वाईट वाटते. गेल्या तीन-चार महिन्यांतील शांततापूर्ण परिस्थिती पाहून, मला आशा आहे की, २०२५ मध्ये राज्यातील वातावरण शांततामय असेल, असे एन बीरेन सिंह म्हणाले होते. (N. Biren Singh)
( हेही वाचा : भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मस्थान स्मारकाला Satyaki Savarkar यांची भेट)
दरम्यान मणिपुर हिंसाचाराला त्यांच्या कारकीर्दीत मिळालेल्या अपयशामुळे त्यांनी हा राजीनामा दिला आहे. यावेळी पुरी मतदारसंघाचे (Puri Lok Sabha constituency) खासदार साबित पात्रा (Sambit Patra) आणि अन्य नेतेही उपस्थित होते. मणिपुरमध्ये (Manipur) दोन महिन्यांच्या अशांततेनंतरही सिंह यांना राज्यात शांतता प्रस्थापित करण्यात अपयश आल्याने हिंसाचारामुळे (Manipur violence) त्यांना दोन पर्याय देण्यात आल्याची चर्चा होती. त्यात एक राजीनामा देण्याचा किंवा केंद्र हस्तक्षेप करून पद ताब्यात घेईल, असे सांगण्यात आले होते. अखेर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. (N. Biren Singh)
Join Our WhatsApp Community