Manipur Lok Sabha Elections : मणिपूरमध्ये मतदानाला गालबोट; गोळीबारात 3 जखमी, EVM तोडले

Manipur Lok Sabha Elections : आजच्या टप्प्यातील मतदानाला हिंसाचाराचे गालबोट लागले आहे. मणिपूरमधील इनर मणिपूर लोकसभा मतदानकेंद्रावर गोळीबार झाला आहे. बिष्णुपूर जिल्ह्यातील थामनपोकपी येथील मतदान केंद्रावर गोळीबार झाला.

216
Thane Election 2024: ठाणे जिल्ह्यात निवडणूक कर्तव्यार्थ असलेले अधिकारी, कर्मचारी, पोलीस मतदान कसे करणार? वाचा सविस्तर...
Thane Election 2024: ठाणे जिल्ह्यात निवडणूक कर्तव्यार्थ असलेले अधिकारी, कर्मचारी, पोलीस मतदान कसे करणार? वाचा सविस्तर...

18 व्या लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांसाठी मतदान सुरू झाले आहे. जागांच्या दृष्टीने हा सर्वात मोठा टप्पा आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे मतदान सुरु रहाणार आहे. या टप्प्यात मणिपूरच्या दोन लोकसभा जागांवरही (मणिपूर अंतर्गत आणि मणिपूर बाह्य) मतदान होत आहे. 26 एप्रिल रोजी बाहेरील जागांच्या काही भागांमध्येही मतदान होणार आहे. (Manipur Lok Sabha Elections)

(हेही वाचा – PUNE: निकृष्ट दर्जाची औषधे ऑनलाइन विकणाऱ्या फार्मास्युटिकल कंपनीला १ लाख रुपयांचा दंड, ग्राहकाला ४५ दिवसांच्या आत नुकसानभरपाई देण्याचे आदेश)

थामनपोकपी येथील मतदान केंद्रावर गोळीबार

आजच्या टप्प्यातील मतदानाला हिंसाचाराचे गालबोट लागले आहे. मणिपूरमधील इनर मणिपूर लोकसभा मतदानकेंद्रावर गोळीबार झाला आहे. बिष्णुपूर जिल्ह्यातील थामनपोकपी येथील मतदान केंद्रावर गोळीबार झाला. यामध्ये ३ जण जखमी झाले आहेत. इम्फाळ पूर्व येथील थोंगजू येथील एका बूथवर ईव्हीएमची तोडफोड झाल्याचेही सांगण्यात येत आहे. मणिपूरमध्ये गेल्या वर्षी ३ मार्चपासून हिंसाचार सुरू आहे. त्याचा परिणाम निवडणूक प्रक्रियेवर होऊ नये, यासाठी प्रशासनाने आटोकाट प्रयत्न केले असले, तरी काही ठिकाणी पडसाद दिसून येत आहेत.

मणिपूरमधील इंफाळमध्ये मतदानापूर्वी महिलांनी मतदानकेंद्रावर पूजा केली. या महिला बूथ क्रमांक 16 वर मतदान करण्यासाठी आल्या होत्या. हिंसाचारग्रस्त राज्यात शांततेत मतदान व्हावे, यासाठी या महिलांनी प्रार्थना केली.

पहिल्या टप्प्यात 1,625 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये 1,491 पुरुष आणि 134 महिला उमेदवार आहेत. 8 केंद्रीय मंत्री, एक माजी मुख्यमंत्री आणि माजी राज्यपालही यावेळी रिंगणात आहेत. एकूण 7 टप्प्यात 543 जागांसाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. सर्व जागांचे निकाल ४ जूनला लागणार आहेत. (Manipur Lok Sabha Elections)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.