मनीष सिसोदीयांच्या अटकेमुळे ‘आप’ला सेटबॅक; काय होणार परिणाम?

117

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना मद्य धोरण घोटाळा प्रकरणी सीबीआयने अटक केली आहे. त्यामुळे केवळ केजरीवाल सरकारलाच नव्हे तर संपूर्ण आम आदमी पक्षाला सेटबॅक बसला आहे. कारण सिसोदिया हे पक्षातील सर्वात मोठे नेते आहेत. त्यांच्या अटकेमुळे अरविंद केजरीवाल यांना सिसोदिया यांचा पर्याय उभा करणे केवळ अशक्य बनणार आहे.

सिसोदिया यांना पर्याय नाही

मनीष सिसोदिया यांच्याकडे दिल्ली सरकारमधील एकूण ३३ पैकी १८ खाती आहेत. सिसोदिया यांच्या अटकेनंतर त्यांचे काम कोण सांभाळणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. केजरीवाल यांचे आणखी एक मंत्री सत्येंद्र जैन हे आधीच तुरुंगात आहेत. जैन यांच्या विभागांचे कामही सिसोदिया पाहत होते. सिसोदिया यांच्याकडे शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, वित्त, उत्पादन शुल्क, ऊर्जा, पाणी, आरोग्य अशी महत्त्वाची खाती आहेत. सिसोदिया यांची जागा घेणे अन्य कोणत्याही नेत्यासाठी सोपे नसेल. फेब्रुवारी २०२० मध्ये मुख्यमंत्री केजरीवाल यांनी त्यांच्या उर्वरित खात्यांचा त्याग केला होता. यानंतर सिसोदिया हे विभागही पाहत होते. आम आदमी पक्षात सिसोदिया यांच्या उंचीचा नेता आणि अरविंद केजरीवाल यांच्या विश्वासातील दुसरा कोणीही व्यक्ती सध्या नाही.

(हेही वाचा शतजन्म शोधिताना… समग्र सावरकर अनुभवताना सभागृह झाले सावरकरमय)

आगामी निवडणुकांत फटका बसण्याची शक्यता 

दिल्ली सरकार पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करत आहे. मनीष सिसोदिया हे बजेटचे सर्व काम पाहत होते. आम आदमी पक्ष सत्तेत येण्यापूर्वी दिल्ली सरकारचे बजेट सुमारे ३०,०००० कोटी रुपये होते, ते आता ७५,००० कोटी रुपये झाले आहे. अर्थमंत्री सिसोदिया तुरुंगात गेल्यास अर्थसंकल्पाच्या तयारीवरही परिणाम होणार आहे. अर्थसंकल्पावर इतक्या लवकर काम करणे इतर कोणत्याही मंत्र्याला अवघड जाईल. येत्या काही महिन्यांत मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसारख्या मोठ्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत, त्यावरही ‘आप’ ला फटका बसण्याची शक्यता आहे. २०१९ च्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने या राज्यांमध्ये आपला केडर तयार केला आहे. पंजाबमधील विजयानंतर पक्षाने या राज्यांमध्ये गांभीर्याने निवडणूक लढवण्याचे ठरवले होते. या कामात सिसोदिया यांच्यावर मोठी जबाबदारी होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.