सेनेच्या वर्धापन दिनापूर्वी ठाकरे गटाला मोठा झटका; मनीषा कायंदे शिंदे गटात प्रवेश करणार

मनीषा कायंदे यांच्यापूर्वी शिशिर शिंदे यांनी आपल्या उपनेते पदाचा राजीनामा दिला.

253
सेनेच्या वर्धापन दिनापूर्वी ठाकरे गटाला मोठा झटका; मनीषा कायंदे शिंदे गटात प्रवेश करणार

एकीकडे ठाकरे गटाचे राज्यव्यापी शिबीर होणार आहे तर दुसरीकडे काही नेत्यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला आहे. अशातच ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या अशी ओळख असलेल्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. आज म्हणजेच रविवार १८ जून रोजी संध्याकाळी त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. मनिषा कायंदे यांच्यासह तीन माजी नगरसेवक देखील शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मनिषा कायंदे या मागच्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यापासून मनीषा कायंदे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या मनिषा कायंदे या नॉट रिचेबल आहेत.

(हेही वाचा – Pune Fire : गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाचे २२ बंब घटनास्थळी दाखल)

शिवसेना पक्षाचा १९ जून रोजी वर्धापनदिन आहे. यावर्षी शिंदे गट आणि ठाकरे गट स्वतंत्रपणे हा वर्धापन सोहळा साजरा करणार आहेत. मात्र वर्धापन दिनापूर्वीच ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. मनीषा कायंदे यांच्यापूर्वी शिशिर शिंदे यांनी आपल्या उपनेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने राजकीय वर्तुळातून चर्चा रंगू लागल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून ते आतापर्यंत ठाकरे गटाकडून शिंदे गटात अनेक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाची चिंता वाढली आहे.

कोण आहेत मनिषा कायंदे?

विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे या भाजपकडून २००९ रोजी सायन कोळीवाड्यातून निवडणूक लढल्या होत्या . त्यानंतर २०१२ साली त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर २०१८ साली त्यांना त्यांच्यावर विधानपरिषदेची जबाबदारी सोपवण्यात आली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.