Mankhurd-Shivajinagar Constituency : उबाठा-काँग्रेसचे उमेदवारी अर्ज बाद

236
Mankhurd-Shivajinagar Constituency : उबाठा-काँग्रेसचे उमेदवारी अर्ज बाद
  • खास प्रतिनिधी 

मुंबईतील मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उबाठा आणि काँग्रेसच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. (Mankhurd-Shivajinagar Constituency)

अर्जांची छाननी

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ या दिवशी मतदान होणार आहे. यासाठी मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून शिवसेना उबाठाचे राजेंद्र वाघमारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर काँग्रेसकडून वासिम जावेद खान यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. शुक्रवारी ३० ऑक्टोबर या दिवशी अर्जांची छाननी करण्यात आली. त्यात महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उबाठाच्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले. (Mankhurd-Shivajinagar Constituency)

(हेही वाचा – Dharavi मध्ये धर्मांधांनी तोडली दिवाळीच्या लाइटींगची माळ; दुकान मालक म्हणतो, आमच्या सणांचा त्यांना त्रास पण…)

दोन आमदार समोरासमोर

मुस्लिमबहुल मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघात समाजवादी पक्षातर्फे विद्यमान आमदार अबू आझमी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातर्फे अणुशक्ती नगरचे विद्यमान आमदार नवाब मलिक यांनी याच मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे तर ‘एमआयएम’ पक्षाचे आतिक अहमद खान हे उमेदवारदेखील निवडणूक रिंगणात आहे. मात्र या मतदारसंघात दोन आमदार, आझमी आणि मलिक, यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. (Mankhurd-Shivajinagar Constituency)

मलिकांना भाजपाचा विरोध

अजित पवार महायुतीत सहभागी असले तरी त्यांच्या पक्षाचे नवाब मलिक यांचा भाजपाकडून प्रचार करण्यात येणार नाही, असे भाजपाकडून जाहीर करण्यात आले. मलिक यांचा संबंध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी असल्याचा आरोप भाजपाने त्यांच्यावर केला आहे त्यामुळे भाजपाकडून त्यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात येत आहे. तर अजित पवार यांनी मलिकांवरील आरोप अद्याप सिद्ध झाले नाहीत, असा युक्तीवाद मांडत मलिकांची पाठराखण केली. अजित पवार यांनी मलिक यांची मुलगी सना यांना अणुशक्ती नगर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. (Mankhurd-Shivajinagar Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.