Mann Ki Baat: आता चंदीगड विमानतळ हुतात्मा भगत सिंग यांच्या नावाने ओळखले जाणार

109

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, रविवारी मन की बात या कार्यक्रमाद्वारे जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यामध्ये चंदीगड विमानतळाला हुतात्मा भगत सिंग यांचे नाव देणाचा निर्णय घेतला आहे. यावेळी महान स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली म्हणून चंदीगड विमानतळाला आता हुतात्मा भगत सिंग यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. पंतप्रधान म्हणाले की, आजपासून तीन दिवसानंतर 28 सप्टेंबर रोजी भगत सिंग यांच्या जयंती साजरी करणार आहोत.

काय म्हणाले मोदी…

येत्या 28 सप्टेंबर रोजी अमृत महोत्सवाचा विशेष दिवस येत आहे. या दिवशी आपण भारत मातेचे शूर वीर सुपुत्र भगत सिंग यांची जयंती साजरी करू. भगत सिंग यांच्या जयंतीपूर्वी त्यांना आदरांजली म्हणून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. चंदीगड विमानतळाला आता हुतात्मा भगत सिंग यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बऱ्याच दिवसापासून या निर्णयाची प्रतीक्षा होती. या निर्णयाबद्दल मी चंदीगड, पंजाब, हरियाणा आणि देशातील सर्व जनतेचे अभिनंदन करतो.

(हेही वाचा – गोंदियात 100 हून अधिक विद्यार्थ्यांचा ट्रकमध्ये कोंबून प्रवास, श्वास गुदमरल्याने विद्यार्थी बेशुद्ध)

आपल्या स्वातंत्र्यसैनिकांकडून प्रेरणा घेऊन, त्यांच्या आदर्शावर चालत त्यांच्या स्वप्नांचा भारत घडवायला हवा, हीच त्यांना आपली श्रद्धांजली असेल. त्यामुळे हुतात्म्यांची स्मारके, त्यांच्या नावावर असलेली ठिकाणे आणि संस्थांची नावे आपल्याला कर्तव्याची प्रेरणा देत असतात, असेही ते म्हणाले. इंडिया गेट येथील राजपथाचे नाव बदलून कर्तव्याच्या मार्गावर सुभाषचंद्र बोस यांचा बसविण्याचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच देशाने कर्तव्य पथावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारून असाच प्रयत्न केला असून आता चंदीगड विमानतळाचे नाव शहीद भगतसिंग यांच्या नावावर करणे हे या दिशेने आणखी एक पाऊल आहे. ते म्हणाले की, ज्या प्रकारे आपण अमृत महोत्सवात स्वातंत्र्यसैनिकांशी संबंधित विशेष सोहळे साजरे करतो, त्याचप्रमाणे प्रत्येक तरुणाने 28 सप्टेंबर रोजी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.