अमृत महोत्सवाची सामूहिक शक्ती देशातच नाही तर जगभरात, मोदींकडून भारतीयांचे कौतुक

152

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी अमृत महोत्सवासोबतच आदल्या दिवशी आयोजित केलेल्या तिरंगा मोहिमेबाबतही चर्चा केली. या कार्यक्रमात मोदींनी असे सांगितले की, स्वातंत्र्यदिनाच्या विशेष प्रसंगी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि ‘हर घर तिरंगा’ मोहिमेदरम्यान देशाची सामूहिक शक्ती पाहायला मिळाली. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेदरम्यान दाखवलेल्या उत्साहाचे आणि देशभक्तीचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. स्वातंत्र्याच्या या महिन्यात ‘अमृत महोत्सवा’ची ‘अमृत धारा’ देशाच्या कानाकोपऱ्यात वाहत आहे. अमृत ​​महोत्सवाचे हे रंग केवळ भारतातच नव्हे तर जगातील इतर देशांमध्येही पाहायला मिळाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वातंत्र्याच्या या महिन्यात आपल्या संपूर्ण देशात, प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात अमृत महोत्सवाची वारे वाहत आहे. अमृत ​​महोत्सव आणि स्वातंत्र्यदिनाच्या या विशेष प्रसंगी आपण देशाच्या सामूहिक शक्तीचे दर्शन घेतले. अमृत ​​महोत्सव आणि स्वातंत्र्यदिनाच्या या विशेष प्रसंगी आपल्या देशाच्या सामूहिक शक्तीचे दर्शन झाले आहे. सगळीकडे चैतन्याची अनुभूती सगळ्यांनी अनुभवली आहे. आपला एवढा मोठा देश, इतकी विविधता, पण तिरंगा फडकवताना आपल्या सर्वांच्या मनात एकच भावना दाटून आल्याचे दिसत होते. तिरंग्याच्या गौरवाचे रक्षक म्हणून लोकांनी स्वत: पुढाकार घेतला. स्वच्छता मोहीम आणि लसीकरण मोहिम राबवतानाही आपण देशाचा हा उत्साह अनुभवला आहे. याचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले आहे.

कृष्णील अनिल जीहे या युवा सहकारी, एक पझल आर्टिस्ट आहेत आणि त्यांनी मोज़ॅक कलेच्या माध्यमातून विक्रमी वेळेत सुंदर तिरंगा तयार केला आहे. तसेच कर्नाटक मधील कोलार येथील लोकांनी 630 फूट लांब आणि 205 फूट रुंद तिरंगा हातात धरून एक अनोखा देखावा सादर केला होता. आसाममधील सरकारी कर्मचाऱ्यांनी दिघालीपुखुरी युद्ध स्मारकावर तिरंगा फडकवण्यासाठी स्वत:च्या हाताने 20 फुटांचा तिरंगा तयार केला. देशाच्या सीमेवर, खोल समुद्रात तसेच सियाचीनच्या बर्फात सगळीकडे आपला तिरंगा फडकला. इंदूरमधील लोकांनी मानवी साखळीच्या माध्यमातून भारताचा नकाशा तयार केला, तर चंदीगडमधल्या तरुणाईनी महाकाय मानवी तिरंगा साकारला. या दोन्ही विक्रमांची नोंद गिनीज रेकॉर्डमध्ये झाली आहे, याची माहितीही पंतप्रधानांनी यावेळी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.