Manohar Joshi : शिवसेनेचा धगधगता इतिहास पाहिलेले शिवसैनिक, नेते काळाच्या पडद्याआड – राज ठाकरे

राजकारणासोबतच महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सांस्कृतीक, कला क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. मनोहर जोशी यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

182
Manohar Joshi : शिवसेनेचा धगधगता इतिहास पाहिलेले शिवसैनिक, नेते काळाच्या पडद्याआड - राज ठाकरे

बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून त्यांच्या सोबतच्या पहिल्या फळीतील मनोहर जोशी (Manohar Joshi) हे ज्येष्ठ नेते. शिवसेनेची धाटणीच आक्रमक, पण त्यात अजातशत्रुत्व जपत सरांची राजकीय वाटचाल सुरु राहिली. शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न होते जे मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झाले. पुढे ते लोकसभा अध्यक्ष झाले आणि नंतर शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे सैनिक म्हणून राहिले. १९६६ पासून शिवसेनेचा धगधगता इतिहास पाहिलेले आणि जगलेले एक शिवसैनिक, नेते आज काळाच्या पडद्याआड गेले. मनोहर जोशी (Manohar Joshi) सरांना भावपूर्ण श्रद्धांजली. अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत. (Manohar Joshi)

सुसंस्कृत, प्रगल्भ नेतृत्व हरपले – विजय वडेट्टीवार

ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) सरांच्या निधनाने सुसंस्कृत, प्रगल्भ नेतृत्व हरपले आहे. सरांच्या जाण्याने मोठी हानी झाली असून त्यांची उणीव सदैव भासणार आहे. नगरसेवक, महापौर, राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभा अध्यक्ष अशी विविध महत्वाची पदे भूषविणाऱ्या जोशी (Manohar Joshi) सरांचे व्यक्तिमत्व सर्वांसाठी प्रेरणादायी होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहणारे आहे. व्यासंगी राजकारणी ही त्यांची ओळख सर्वश्रुत आहे. लोकशाहीचा पुरस्कार करणारे, विकासाचा ध्यास असणारे ते नेते होते. कोहिनूर सारख्या विविध संस्थांच्या माध्यमातून सरांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, सिंचनातील कृष्णा खोरे विकास महामंडळाची सुरुवातही, टॅकरमुक्त महाराष्ट्र घोषणा, महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवातही जोशी सरांच्या प्रयत्नाने झाली. लोकसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता. अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत. (Manohar Joshi)

निष्ठावंत, अनुभवी, सुसंस्कृत नेतृत्व हरपले – नाना पटोले

माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या निधनाने एक निष्ठावंत, अभ्यासू, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व हरपले आहे. (Manohar Joshi)

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आलेल्या जोशी सरांनी निष्ठेने आणि मेहनतीने मुंबईचे नगरसेवक, महापौर, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभा अध्यक्ष असा प्रदीर्घ राजकीय प्रवास केला. आपल्या राजकीय जीवनात त्यांनी अनेक चढऊतार पाहिले पण कधीही निष्ठा आणि विचारांशी तडजोड केली नाही. आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी ते लढत राहिले. राजकारणासोबतच महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, कला क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. (Manohar Joshi)

(हेही वाचा – Sandeshkhali Violence : संतप्त लोकांनी शाहजहान शेखच्या मालमत्ता जाळल्या; ममता सरकारच्या वाढल्या अडचणी)

सुजाण व सुसंस्कृत नेतृत्व हरपले! – अशोक चव्हाण
माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी (Manohar Joshi) यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुजाण व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याचे माजी मुख्यमंत्री व राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. (Manohar Joshi)
मनोहर जोशी यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना खासदार चव्हाण म्हणाले की, नगरसेवक, महापौर, विधानपरिषद व विधानसभेचे आमदार, राज्यसभा व लोकसभेचे खासदार, केंद्रीय मंत्री, लोकसभा अध्यक्ष व मुख्यमंत्री असा त्यांचा ‘गल्ली ते दिल्ली’पर्यंतचा संघर्षमय व प्रदीर्घ राजकीय प्रवास कार्यकर्त्यांच्या नव्या पीढीसाठी प्रेरणादायी व अनुकरणीय आहे. कला, साहित्य, संस्कृतीवर त्यांचे प्रचंड प्रेम होते. अतिशय व्यस्त दैनंदिनी असलेल्या काळातही आपले हे प्रेम त्यांनी कधी कमी होऊ दिले नाही. अभ्यासू व कुशाग्र बुद्धीमत्ता, फर्डे वक्तृत्व तसेच मार्मिक स्वभावाचे धनी असलेल्या मनोहर जोशी सरांकडे उत्तम संघटन कौशल्य होते. त्यातून त्यांनी आपला एक मोठा चाहता वर्ग निर्माण केला होता. त्यांचे निधन महाराष्ट्राची मोठी हानी आहे. (Manohar Joshi)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.