पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही जिल्ह्यात २२ ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावर पोलिसांनी कडक कारवाई करत ४२५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याविरोधात शिरूर आणि अंमळनेर या दोन पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्ह्यात २४ फेब्रुवारी रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार, रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली होती, परंतु कोठेही अनुचित प्रकार घडला नव्हता. पोलिसांनी एकाही आंदोलनासाठी परवानगी दिलेली नव्हती. असे असतानाही २२ ठिकाणी रस्ता अडवून सामान्यांना वेठीस धरण्यात आले होते. वाहनांच्याही लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे सामान्यांना त्रास झाला होता. हाच धागा पकडून पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
(हेही वाचा – Defense Expo 2024: लष्कर प्रमुखांनी महाराष्ट्र एमएसएमई ‘डिफेन्स एक्स्पो 2024’ ला भेट दिली)
जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत २२ गुन्हे दाखल झाले असून जवळपास ४२५ पेक्षा जास्त आंदोलकांचा यात समावेश आहे तसेच पाटोदा तालुक्यातील अंमळनेर व शिरूर पोलीस ठाण्यात मनोज जरांगे यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. जरांगे यांच्या आवाहनानुसार, हे आंदोलन झाल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community