Manoj Jarange : ‘२६ जानेवारीपर्यंत तोडगा काढा’; जरांगेंचा सरकारला इशारा

आम्हाला मुंबईत येऊ नका असे कसे म्हणता, आम्ही जर म्हटलं त्यांना की तुम्ही मुंबईत येऊ नका तर जमेल का?, मुंबईत येऊ नका असे म्हणणे ही कोणती भाषा आहे. इथे दादागिरीची भाषा कोणी करू नये - मनोज जरांगे पाटील

318
Manoj Jarange : '२६ जानेवारीपर्यंत तोडगा काढा'; जरांगेंचा सरकारला इशारा

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे त्यांच्या मुंबई दौऱ्याला निघाले आहेत. त्यांनी शनिवार २० जानेवारी पासून त्यांच्या मुंबई दौऱ्याला सुरुवात केली आहे. आज म्हणजेच रविवार २१ जानेवारी त्यांच्या या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. ‘२६ जानेवारीपर्यंत आरक्षणावर तोडगा काढा’, असा इशारा त्यांनी दिला आहे.

(हेही वाचा – Ayodhya Shri Ram Mandir : २२ जानेवारी रोजी अयोध्या १० लाख दिव्यांनी उजळणार)

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील ? 

“कोणीही संविधान हातात घेऊ नये, आरक्षणावर (Manoj Jarange) तोडगा कसा काढता येईल याचा विचार करावा. सत्ता येत असते जात असते. मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होणार आहे. आम्ही आमच्या मागणीवर, मुद्द्यावर ठाम आहोत. तशा आमच्या नोंदी देखील सापडल्या आहेत. त्यांना मराठ्यांची ताकद पहायची असेल. मराठा समाजाचा हा शेवटचा लढा आहे. दोन दिवस वाट पाहणार अन्यथा सरकारला आम्ही आमच्या गावात येऊ देणार नाही. आम्हाला मुंबईला येऊ नका असे कसे म्हणता ? इथे कोणीही दादागिरीची भाषा करू नये. तसेच २६ जानेवारीच्या आधी आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढावा” असा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी दिला आहे.

(हेही वाचा – Weather Update : राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट! ‘या’ भागात पावसाची शक्यता)

दादागिरीची भाषा करू नये – 

पुढे बोलताना जरांगे म्हणाले की; “आम्हाला मुंबईत येऊ नका (Manoj Jarange) असे कसे म्हणता, आम्ही जर म्हटलं त्यांना की तुम्ही मुंबईत येऊ नका तर जमेल का?, मुंबईत येऊ नका असे म्हणणे ही कोणती भाषा आहे. इथे दादागिरीची भाषा कोणी करू नये. आम्ही तुमच्यावर गुलाल टाकायला येतोय, तुम्ही नशीबवान आहात. काम झाल्यावर लोक विसरून जातात, मात्र तुम्ही भाग्यवान आहात की करोडो मराठे तुमच्यावर गुलाल टाकायला येत आहेत,असे जरांगे (Manoj Jarange) म्हणाले.

(हेही वाचा – Konrad Bloch : जेव्हा एका ज्यू कुटुंबातील मुलगा वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक पटकावतो)

जरांगे यांचा सरकारला इशारा –

आम्ही मुंबईला पोहोचेपर्यंत तुम्ही निर्णय घ्या, आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत. मात्र, मराठ्यांना आरक्षण (Manoj Jarange) द्यायचं नाही, त्यांच्या मुलांना मोठं होऊ द्यायचं नाही यावर सरकार देखील ठाम असल्याचं दिसून येत आहे. कारण कुणबी नोंदी सापडलेल्या असताना देखील आरक्षण दिले जात नसेल, तर त्यांना मराठ्यांची ताकद दिसेल. आम्ही सरकारला यावर निर्णय घेण्यासाठी आणि विचार करण्यासाठी सात महिन्याचा वेळ दिला होता. त्यामुळे आता दोन दिवस वाट पाहू, त्यानंतर त्यांना देखील आमच्या गावात येऊ देणार नाही, असे जरांगे (Manoj Jarange) यांनी सांगितले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.