मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) लाखोंच्या संख्येने मराठा समुदाय घेऊन मुंबईकडे येत आहेत. २५ जानेवारी रोजी त्यांनी नवी मुंबईकडे कूच केली आहे आणि २६ जानेवारी रोजी ते मुंबईत धडकणार आहेत. मात्र त्यांना नवी मुंबईतच थोपवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. अशातच मनोज जरांगे पाटील यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.
काय म्हणाले जरांगे-पाटील?
सकाळी कुणीतरी अधिकारी आले आणि झोपेच्या नादात माझी सही घेतली, न्यायालयाची कागदपत्रे असल्याचे सांगत त्यांनी माझी सही घेतली, पण त्याचा दुरुपयोग केला तर गाठ माझ्याशी आहे. सकाळी कुणीतरी अधिकारी आला आणि त्याने मला कोर्टाचा कागद असल्याचे सांगत माझी सही घेतली. आम्ही कोर्टाचा मान सन्मान ठेवतो, त्यामुळे मी लगेच सही केली. त्यात एक मराठी कागद होता आणि एक इंग्रजी कागद होता. पण सकाळी मोर्चाची गडबड असताना, मी झोपेत असताना माझी सही घेतली. माझ्यासह यात इतर नऊ जण असल्याचे सांगत त्यांनी सही घेतली, असे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले.
वाशीमध्ये मुक्काम
मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) हे आंदोलक समर्थकांसह लोणावळ्याहून वाशीकडे निघाले. कार्यकर्ते आणि पोलीस सांगतील तसे ते पुढे मार्गक्रमण करणार आहेत. २५ जानेवारी रोजी त्यांचा वाशीला मुक्काम असणार आहे. २६ जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावर जाणार आहेत.
Join Our WhatsApp Community