‘मराठा समाजाला एकदा आरक्षण मिळू द्या, त्यानंतर छगन भुजबळांना बघतो’ असा इशारा मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला आहे. ते गुरुवारी (७ डिसेंबर) स्थानिक ढाणकी मार्गावरील गो. सी. गावंडे महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या जाहीर सभेत बोलत होते.
नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील ?
मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणाले की, “राज्यात छगन भुजबळ यांच्यासारखा दुसरा कलंकित मंत्री असूच शकत नाही. भुजबळ यांच्यासारखा ज्येष्ठ मंत्री, गोरगरीब मराठ्यांच्या मुलांना मिळणाऱ्या आरक्षणात आडवा येत असेल तर त्यांना आपण एकटेच पुरून उरतो. फक्त मराठा समाजाने विश्वास ठेवावा, असे आवाहन जरांगेंनी केले.”
(हेही वाचा – Neelam Gorhe : ‘संजय राऊत यांना बळीचा बकरा बनवण्यावत आलं’)
यावेळी मराठा समाजाला उद्देशून जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणाले की, “ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडणे लावण्याची कामं छगन भुजबळकडून होत आहे. मराठा बांधवांनी कुणाच्याही अंगावर जाऊ नये. आंदोलन शांततेच्या मार्गाने केले तर आंदोलनाची ताकद वाढेल. ७० वर्षानंतर आरक्षण निर्णय प्रक्रियेत आपण आता आलोय. त्यामुळे आंदोलनाला कुठेही गालबोट लागू न देण्याचे आवाहन त्यांनी केले.”
आरक्षण मिळाल्याशिवाय सरकारला सुट्टी देणार नाही
७० वर्षांपूर्वीच्या नोंदीप्रमाणे आरक्षण दिले असते तर या देशात प्रगत जात म्हणून मराठा समाज नंबर एकवर असता. आता आरक्षण मिळाल्याशिवाय सरकारला सुट्टी देणार नसल्याचेही जरांगे म्हणाले. कोणत्याही स्वरूपात हिंसक आंदोलन करू नका. छगन भुजबळ यांच्या नादी लागू नका. आगामी २४ डिसेंबर हा मराठ्यांच्या विजयाचा दिवस असेल असेही जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी यावेळी सांगितले.
हेही पहा –