बीडमधील नारायण गडावर पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपस्थितीमध्ये दसरा मेळावा (Dasara Melava 2024) झाला. या मेळाव्यातून मनोज जरांगे यांनी महायुती सरकारला इशारा दिला आहे. न्याय मिळाला नाही तर यावेळी उलथापालथ करावीच लागेल. असं विधान मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दसरा मेळाव्यात बोलताना केलं आहे.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले, “या समुदायावर संस्कार आहेत. हा समुदाय कधीही मस्तीत वागला नाही. प्रत्येकाला सांभाळून घेण्याचं आणि साथ देण्याचं काम या समाजाने केलं. या समाजाने कधीही जातीवाद केला नाही. एवढं मोठं व्यासपीठ जर पुरत नसेल तर खरोखर तुमच्या समोर आज मला नतमस्तक व्हावं लागेल. एकदा जर तुम्ही साथ द्यायची ठरवलं तर तुम्ही पूर्णपणे साथ देता. मग तुम्ही हटत नाहीत. एकदा जर तुम्ही नाही म्हणाले तर मग साथ देतच नाहीत. आपण आज काही बोलणार नाही, मर्यादा पाळणार. जरी तुमची इच्छा असली बोलावं, पण मी आपल्या हिंदू धर्माची शिकवण आणि नारायण गडाची शिकवण पाळणार आहे. एकमेकांना समजून घेण्याची शिकवण आपल्याला दिलेली आहे. गडाचा आशीर्वाद ज्यांना ज्यांना मिळतो ते दिल्लीला सुद्धा झुकवतो. याआधी ज्यांना आशीर्वाद मिळाला त्यांनी दिल्लीला झुकवले. पण ते नंतर उलटले.” असं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community