मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभे करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मागील महिन्यातच हजारो मराठा समाजाचा हजारोंच्या संख्येने मुंबईच्या दिशेने मोर्चा काढला होता, मात्र हा मोर्चा वाशीपर्यंत येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्याने त्यांचा मोर्चा विसर्जित झाला. मात्र आता दोन आठवड्यानंतर जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. शनिवार, १० फेब्रुवारीपासून आंतरवली सराटी येथे हे उपोषण सुरु होणार आहे. त्याच्यासोबत ५०० जन उपोषणाला बसतील, अशी माहिती आहे.
(हेही वाचा : Uttarakhand UCC : समान नागरी कायद्याच्या विरोधात उत्तराखंडात ‘शाहीन बाग’ची पुनरावृत्ती होणार?)
अध्यादेशाची अंमलबजावणी नाहीच
विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवून कायदा करण्याच्या मागणीसाठी जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे उपोषण करणार आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या अध्यादेशाला 9 फेब्रुवारीला पंधरा दिवस पूर्ण झाले. मात्र अद्याप सगेसोयरे या अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्याने शनिवारपासून पुन्हा एकदा मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसणार आहेत. सकाळी 10 वाजल्यापासून मनोज जरांगे आंतरवली सराटीला उपोषणाला बसणार आहेत. मनोज जरांगे पाटील चौथ्यांदा उपोषणाला बसणार आहेत. सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा मराठा समाजाला लाभ होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असा इशारा जरांगेंनी दिला आहे.
Join Our WhatsApp Community