Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण आंदोलन ३ मार्चपर्यंत स्थगित, जरागेंची घोषणा

235
आशिष शेलार यांचा Manoj Jarange Patil यांना सवाल; म्हणाले...

मनोज जरागे पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी बुधवारी मराठा आरक्षणाचे आंदोलन ३ मार्चपर्यंत स्थगित करण्याची घोषणा केली आहे. बारावीची परीक्षा सुरू असल्यामुळे मराठा आंदोलन ३ मार्चपर्यंत स्थगित केले जात आहे. तोपर्यंत धरणे आंदोलन केले जाईल, असे जरांगे यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रातील मराठा समाजात चलबिचल नको, आपली ओबीसीमधून आरक्षणाची मागणी आहे, असेही मनोज जरांगे म्हणाले. छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

(हेही वाचा – LokSabha Election 2024: भाजपाकडून लोकसभांसाठी २३ निवडणूक निरीक्षकांची घोषणा, पंकजा मुंडेंकडे नवीन जबाबदारी)

पोलिसांना केली विनंती
यावेळी ते असेही म्हणाले की, ‘दडपशाही सुरू आहे, आंतरवाली सराटी येथील मंडप काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे पोलिसांना विनंती आहे की, ते मंडप काढू नका आणि गावकऱ्यांवरील दडपशाही बंद करण्यात यावी. आजपासून दडपशाही रोखण्यासाठी करोडो मराठ्यांनी राष्ट्रपती, राज्यपाल यांना ई-मेल करावे. सरकारच्या वेबसाईटवर ई-मेल करावे, असे आवाहन देखील जरांगे यांनी केले आहेत.’

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.