मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी त्यांची नौटंकी आता बंद करावी. समाजाच्या नावाखाली मागच्या सात-आठ महिन्यात त्यांनी आपला वरदहस्त निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मागचा बोलवता धनी कोण आहे? हे त्यांनी आता जाहीर करावी. त्यांच्या मागे सिल्व्हर ओक आहे की, जालना जिल्ह्यातील भैया कुटुंब आहे. जरांगेंचे सत्य आता लोकांसमोर यायला लागले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे मराठा समाजावर अनंत उपकार आहेत. तरीही जरांगेंना सारखं सारखं फडणवीस यांचं नाव घ्यायलं लावलं जात आहे, असा इशारा भाजपा आमदार प्रसाद लाड यांनीही टीका केली. ते म्हणाले,
सागर बंगल्याची भिंतही त्यांना ओलांडता येणार नाही – नितेश राणे
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं आंदोलन मराठा आरक्षणासाठी आहे की, देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्यासाठी? त्यांनी हा लढा कशासाठी सुरू केला होता? मनोज जरांगे जी स्क्रिप्ट वाचून दाखवत आहेत, ती नेमकी कुणाची आहे? कारण आम्हाला या स्क्रिप्टमधून तुतारीचा वास यायला लागला आहे. हा लढा मराठा समाजाचा असेल तर तो लढा मराठा समाजापर्यंत मर्यादीत ठेवावा. जर त्यांनी आमच्या नेत्यावर आरोप करण्याचं राजकारण केलं आणि खालच्या पातळीवर येऊन टीका केली. तर सागर बंगल्याची भिंतही त्यांना ओलांडता येणार नाही”, अशी प्रतिक्रिया भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.
या आंदोलनाची दिशा बदलत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाच्या सर्व बाजू स्पष्टपणे सांगितल्या आहेत. या सरकारने समाजाला 10 टक्के आरक्षणही दिले आहे. त्यांच्या पुढाकारानेच लाखो कुणबी समाजच्या नोंदी काढल्या गेल्या, साडेतीन लाख कर्मचाऱ्यांना कामाला लावून सर्वे केला गेला. आता काही लोक आंदोलनाला भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत, आरक्षण टिकणार नाही असे सांगत आहेत. गेल्यावेळी सुप्रीम कोर्टाने मराठा समाज मागास कसा, याचे पुरावे द्या, असे सांगितले होते. त्यामुळेच या सरकारने सर्वे करुन त्या सर्व गोष्टी क्लिअर केल्या आहेत. आता मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे. काही लोक समाजाची माथी भडकवण्याचे काम करत आहे. मी जरांगेंना (Manoj Jarange Patil) विनंती करतो की, तुम्ही थेट मुख्यमंत्र्यांशी बोला. ज्यांच्यावर तुम्ही टीका करत आहात, त्यांच्याशी चर्चा करा, चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न करा, असे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट म्हणाले.