Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांचे पुन्हा उपोषण सुरु; सरकारला दिला अल्टिमेटम

117

मराठा आंदोलक मनोज जरांगे हे मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथे उपचार घेत होते. त्यांना नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणासाठी तयार झाले. त्यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून सरकारला थेट इशारा दिला आहे.

४० दिवसांत मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळाले नाही, तर आम्ही कशी फजिती करतो, हेच पाहा, अशा शब्दांत मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, एकदा शब्द दिल्यावर आम्ही मराठे मागे हाटत नाही. पण आम्हाला ४० दिवसांनी आरक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी तुम्ही काय करायचे? तुमच्या समितीनं काय करायचं? या भानगडीत आम्हाला पडायचं नाही. आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे आणि ते आम्ही मिळवणार म्हणजे मिळवणार. हे आंदोलन सर्वसामान्य लोकांनी उभं केलं आहे. तुम्ही आतापर्यंत सगळे डाव टाकले आहेत. आता डाव टाकण्याची वेळ आमची आहे. आमचा डाव पडला तर तुमची कशी फजिती करतो, ते पाहाच,” अशा शब्दात मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.