Ajit Pawar : अडचणीच्या काळात अजित पवार करतात आजारपणाची ढाल

बाकीच्या कार्यक्रमांना ते जातात पण मराठा आरक्षणासाठी म्हटले की लगेच आजारी पडतात, असं सडेतोड उत्तर मनोज जरांगे पाटील यांच्या मुलीने दिले आहे.

160
मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक १० दिवसांत सुरळीत करा, अन्यथा... DCM Ajit Pawar यांचा इशारा

मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी अन्न-पाणी त्याग करुन आमरण उपोषण सुरू केले आहे, सोमवार (३० ऑक्टोबर) उपोषणाचा सहावा दिवस आहे. दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावत आहे अशातच सरकारमध्ये सामील उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्येत देखील खराब झाली आहे. अजित पवार आंतरवलीत येणार होते पण त्यांना आता डेंग्यू झाला आहे, बाकीच्या कार्यक्रमांना ते जातात पण मराठा आरक्षणासाठी म्हटले की लगेच आजारी पडतात, असं सडेतोड उत्तर मनोज जरांगे पाटील यांच्या मुलीने दिले आहे. (Ajit Pawar)

आज यवतमाळ येथे होत असलेल्या “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमाला देखील अजित पवार हजर राहणार नाहीत. जेव्हा जेव्हा सरकार अडचणीत येते किंवा आपल्या मनासारखे घडत नाही तेव्हा अजित पवार हे एक तर नाराज होतात किंवा आजारी तरी असतात. यावेळी देखील नाराजी नाट्यानंतर खुलासे देताना आजारपणाचे कारण समोर करण्यात आले होते. यामुळेच आता आजारपण हे त्यांचे राजकीय आजारपण आहे का? असे देखील राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. याआधी देखील शासन आपल्या दारी अंतर्गत झालेल्या कार्यक्रमात अजित पवार अनुपस्थित होते. एकटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच कार्यक्रमाला सामोरे गेले होते. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण संपवताना देखील अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस हे आंतरवाली सराटी येथे गेले नव्हते. (Ajit Pawar)

(हेही वाचा – MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेचा निर्णय ३१ डिसेंबरपूर्वी घ्या – सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश)

अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्यापासून सारखे आजारी पडतात, त्यांना नवीन सत्ता मानवत नाही का? याआधी महाविकास आघाडीचे सरकार असताना कोविडच्या संपूर्ण कार्यकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयात उपस्थित नसताना देखील राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री अजित पवार हे नियमित करत होते. तेव्हा ते देवळा वेळेस आजारी पडले नसतील त्यापेक्षा अधिक वेळा महायुतीच्या सरकारमध्ये ते आजारी पडत आहेत. सरकारसाठी अडचणीचा काळ आल्यानंतरच उपमुख्यमंत्री अजित पवार आजारी पडतात हा त्यांचा आजार राजकीय असल्याचे सर्वसामान्यांमध्ये बोलले जाते. त्यामुळेच त्यांच्या आजारी पडण्याच्या टाइमिंग पाहता लोकांमध्ये, जनसामान्यांमध्ये संशय निर्माण होत आहे. (Ajit Pawar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.