विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन विधानसभा निवडणुकीत उमेदवार देण्याची घोषणा करून मनोज जरांगे यांनी बरीच हवा केली होती. त्याप्रमाणे अनेकांना उमेदवारी अर्ज भरायला सांगितले. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली. तसेच ज्या ज्या कार्यकर्त्यांनी अर्ज भरले, त्यांना अर्ज मागे घेण्यास लावले. यावर मुस्लिम धर्मगुरूंनी फसवणूक केल्यामुळे जरांगे पाटलांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे मनसे नेते प्रकाश महाजन यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा, मुस्लीम व दलित या 3 समाजाची मोट बांधून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा केली होती. पण मित्रपक्षांनी उमेदवार निश्चित न केल्यामुळे त्यांनी सोमवारी सकाळी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेमुळे त्यांच्या समर्थकांना जबर धक्का बसला. या पार्श्वभूमीवर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी उपरोक्त खोचक टिप्पणी केली आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली? या प्रश्नाचे उत्तर तेच देऊ शकतात. पण कदाचित मुस्लीम धर्मगुरुंनी ऐनवेळी दगा दिल्यामुळे त्यांच्यावर असा निर्णय घेण्याची वेळ आली असावी असे मला वाटते. मुस्लिमांचे कुणाच्या बाजूने व कुणाच्या विरोधात मतदान करायचे हे ठरले आहे. मौलाना नोमानी यांचे विधान पाहता मुस्लिमांनी हिंदूधर्म मानणाऱ्या पक्षाच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे हिंदूंनी याचा विचार केला पाहिजे. मुस्लीम धर्मगुरुंनी त्यांच्यासोबत जाण्याची फारशी रुची दाखवली नाही. त्यांनी त्यांना फसवले. यामुळेच त्यांनी माघार घेतली, असे महाजन म्हणाले.