मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यातील वाद शांत होत नाही तोच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि जरांगे पाटील यांच्यातील वाद पेटला आहे. विरोधी पक्षनेते विजय वड्डेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यांनंतर मनोज जरांगे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विजय वड्डेट्टीवार (Vijay Vaddettiwar) यांनी म्हटले की, ‘मराठा तरुणांनी अभ्यास करून विचार करून आपण कोणाला साथ देत आहे, आपला भलं कशात आहे, हित कशात आहे, याचा विचार करावा…असे विधान केले आहे.
यावर प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले की, “आम्हाला मोडायचा सामूहिक कट तुम्ही रचला होता. आता फालतू शब्द बोलून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहात. पण आमची मुलं दूधखुळी नाहीत, मराठ्यांचे मुडदे पडायला तुम्ही जबाबदार आहात, आता तुमच्या सल्ल्याची सुद्धा गरज नाही,” अशा शब्दांत जरांगे यांनी वड्डेट्टीवार यांना सुनावले आहे.
(हेही वाचा – Virender Sehwag : “पाकिस्तान झिंदा – भाग…” ; जाणून घ्या वीरेंद्र सेहवाग नेमकं काय म्हणाला)
नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?
“वडेट्टीवार यांसारख्या लोकांना गोरगरीब आठवत नाही. मात्र आता हे कुणासाठी काम करता हे कळलं आहे. कधी काय तर कधी काय? तुम्ही सरड्यासारखे रंग बदलत आहात. तुमच्यासारखा विरोधी पक्ष देशात नाही. मुळात यांची विचारधारा मराठ्यांविषयी विष पेरणारी आहे. हा मनोज जरांगे हे सगळं राजकारणासाठी करतो, असे एकही मराठा ओबीसी महणू शकत नाही. तुम्हाला मराठा समाजशिवाय माया नाही, आम्हाला तुम्ही सांगू नका, काय करायचं, अभ्यास करायचा की नाही हे आमच्या मुलांच्या बुद्धीवर आहे, आमच्या (Manoj Jarange Patil) मुलांना तुम्ही सांगायची गरज नाही. तुमच्यासारख्या लोकांनीच आम्हाला संपवलं आहे. आम्हाला मोडायचा सामूहिक कट तुम्ही रचला होता. आता फालतू शब्द बोलून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत, पण हे होऊ देणार नाही, असा सज्जड दमच मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी दिला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community