मराठा आरक्षणाचे लढणारे नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर भारतीय जनता पक्षातले नेते संतप्त झाले आहेत. अंतरवाली सराटीहून सागर बंगल्याच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी ‘आम्ही पण मराठे आहोत, गप्प बसणार नाही’, असा पलटवार करून त्यांनी जरांगेंना खुलं आव्हान दिलं आहे.
तुम्ही सागर बंगल्यावर येणार आणि आम्ही काय गप्प बसणार काय? सागर बंगल्याआधी आमची एक भिंत आहे, आधी ती भिंत पार करा, असं आव्हानच जरांगेंना नितेश राणे यांनी दिलं आहे, तर जरांगेंच्या स्क्रिप्टचा बोलविता धनी कोण आहे? असा सावल आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे.
(हेही वाचा – PM Narendra Modi यांच्या मन कि बात कार्यक्रम तीन महिने स्थगित; कारण… )
माझा एन्काउंटर व्हावा, हे फडणवीसांचं स्वप्न
सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी दुपारी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केला आहेत. मला सलाइनमधून विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला. माझा एन्काउंटर व्हावा, हे फडणवीसांचं स्वप्न आहे. त्यांना एवढीच खुमखुमी आहे ना, तर ही बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो. मला त्यांनी मारून दाखवावं, परंतु मी समाजाशी असलेली इनामदारी सोडू शकणार नाही, असं जरांगे म्हणाले. त्याचवेळी मंचावरून ताडकन उठून मुंबईच्या दिशेने चालत निघाले आहेत. गावकऱ्यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी गावकऱ्यांचं ऐकलं नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community