२० जानेवारीपासून पाटील मुंबई मध्ये आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करणार आहेत. बीड मधल्या सभेतून जरांगे पाटलांनी ही घोषणा केली आहे. मात्र त्यांच्या या घोषणेमुळे सरकार चांगलेच अडचणीत येणार आहे. एकीकडे २२ जानेवारीला राम मंदिराचा सोहळा आणि तर टाटा मॅरेथॉनची सांगता २१ जानेवारीला आझाद मैदानात होणार आहे. दुसरीकडे जरांगेचे आमरण उपोषण सरकारला डोकेदुखी ठरू शकते अशीच चर्चा होत आहे. त्यामुळे सरकार यावर सकारात्मक निर्णय घेईल अशी चर्चा रंगली आहे. (Manoj Jarange)
(हेही वाचा : Aaditya L-1 update : आदित्य एल -१ ‘या’ दिवशी निर्धारित ठिकाणी पोहचेल)
काय आहे मनोज जरांगे यांचे नियोजन
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी १८ जानेवारी पर्यंत नोटिस दिल्या आहेत. त्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की तुम्ही ट्रॅक्टर दाबू शकता पण मराठ्यांना दाबू शकत नाही. असे म्हणून आपण आमरण उपोषण करणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले आहे. त्यासाठी मराठ्यांनी शांततेत मुंबईत यायच. तसेच पुढे सूचना देताना त्यांनी सांगितले की, पायी मुंबईला जाताना वाटेत लोक सोबत येतील मुंबईकडे जायला निघतील. मुंबईला येताना कोणीही हिंसा करायची नाही. मराठ्यांना कोणताही डाग लागू द्यायचा नाही. कुणीही जाळपोळ, तोडफोड करायची नाही. शांतेत जायच शांतेत यायच. जो हिंसा तो आपला नाही हिंसा करणाऱ्याना पकडून द्या. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे यायच नाही. अशा सूचना त्यांनी इतर मराठा बांधवांना दिल्या आहेत. (Manoj Jarange)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community