UPSCचे अध्यक्ष Manoj Soni यांचा कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा!

123
UPSCचे अध्यक्ष Manoj Soni यांचा कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा!
UPSCचे अध्यक्ष Manoj Soni यांचा कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा!

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) चे अध्यक्ष मनोज सोनी (Manoj Soni) यांनी त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी राजीनामा दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार UPSC चेअरपर्सन मनोज सोनी यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला आहे. द हिंदू वृत्ताने सोनी यांच्या राजीनाम्याचे वृत्त दिल्यानंतर खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून काही आयएएस अधिकारी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले असतानाच सोनी यांनी राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

देशभर गाजत असलेल्या वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणानंतर हा राजीनामा आल्याने त्याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. आयएएस झालेल्या पूजा खेडकरच्या कारनाम्यावरून युपीएससीवर देशभरातून सडकून टीका होत आहे. दररोज बनवाबनवी समोर येत असतानाच सोनी यांनी राजीनामा दिल्याने दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध आहे का? अशी सुद्धा चर्चा रंगली आहे. (Manoj Soni)

राजीनाम्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही

मनोज सोनी यांचा कार्यकाळ 2029 मध्ये संपणार होता. मात्र पाच वर्षांपूर्वी त्यांनी राजीनामा दिला. ते 2017 मध्ये लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून रुजू झाले. प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरचा वाद चर्चेत असतानाच हा राजीनामा दिला आहे. मात्र, राजीनाम्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मनोज सोनी यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केल्याचे समजते. मात्र, सरकारने अद्याप नवीन अध्यक्षांचे नाव जाहीर केलेले नाही. (Manoj Soni)

मनोज सोनी कोण आहेत ?

मनोज सोनी यांना आता आपला अधिक वेळ गुजरातमधील स्वामिनारायण पंथाची शाखा अनुपम मिशनला घालवायचा आहे. 2020 मध्ये दीक्षा घेतल्यानंतर ते अनुपम मिशनमध्ये साधू किंवा निष्काम कर्मयोगी बनले. मनोज सोनी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे मानले जातात. 2005 मध्ये, जेव्हा ते 40 वर्षांचे होते, तेव्हा नरेंद्र मोदींनी त्यांना वडोदरा येथील प्रसिद्ध एमएस विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्त केले. अशा प्रकारे ते देशातील सर्वात तरुण कुलगुरू बनले. (Manoj Soni)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.