Amol Mitkari यांच्या वाहनावर हल्ला करणाऱ्या मनसैनिकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

255
Amol Mitkari यांच्या वाहनावर हल्ला करणाऱ्या मनसैनिकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
Amol Mitkari यांच्या वाहनावर हल्ला करणाऱ्या मनसैनिकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्या वाहनावर हल्ला प्रकरणात सहभागी असलेल्या मनसैनिकाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवार, ३० जुलैच्या रात्री घडली. जय मालोकार (२४) असे मृत मनसैनिकाचे नाव आहे.

(हेही वाचा – Wayanad landslides : मृतांची संख्या आतापर्यंत 123; केरळची स्थिती का झाली नाजूक ?)

अजित पवार (Ajit Pawar) पुण्यात नसतानाही येथील धरणे भरल्याची टीका राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली होती. त्या टीकेला आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रत्युत्तर दिले. राज ठाकरे ‘सुपारीबहाद्दर’ असल्याची टीका त्यांनी केली होती. या वेळी बोलतांना आमदार मिटकरी म्हणाले होते की, टोल आणि भोंग्यांचे आंदोलन फसलेल्या सुपारीबहाद्दरांनी अजित पवारांवर बोलू नये. कुठल्याही आंदोलनाला ते यशस्वी करू शकले नाहीत. राज ठाकरेंची विश्वासार्हता संपली आहे.

या टीकेमुळे मनसैनिक चांगलेच आक्रमक झाले. यातून अमोल मिटकरी यांच्या वाहनाची अकोल्यात तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर आमदार अमोल मिटकरी यांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी मनसेच्या पदाधिकारी व मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला. आमदार अमोल मिटकरी यांनी ठिय्या आंदोलन करून दबाव आणल्याने मनसैनिकाचा मृत्यू झाल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

नेमके काय घडले ?

मनसैनिक जय मालोकार यांच्या मृत्यूला आमदार अमोल मिटकरी जबाबदार असल्याचा आरोप पंकज साबळे यांनी केला आहे. वाहन तोडफोड आंदोलन प्रकरणात पोलिसांनी पदाधिकारी व मनसैनिकांवर गुन्हे दाखल केले. त्यामध्ये जय मालोकार यांचा देखील सहभाग होता. आंदोलन प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने मनसैनिक जय मालोकार प्रचंड तणावात आले. या दबावातूनच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि उपचारासाठी त्यांना तत्काळ शहरातील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

उपचारादरम्यान मनसैनिक जय मालोकार यांचा मृत्यू झाल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी दिली. जय मालोकार (Jai Malokar) यांचे होमिओपॅथीच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण सुरू होते. मनसेचे आंदोलन व त्यानंतर पोलीस कारवाईचा दबाव आल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा आरोप होत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.