महाराष्ट्राच्या राजकारणात २ जुलै २०२३ हा दिवस फार मोठ्या घडामोडींमुळे महत्वाचा ठरला. काल म्हणजेच रविवार २ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार तसेच त्यांच्या ८ सहकाऱ्यांनी रविवार (२ जून) युती सरकारमध्ये सहभागी होत मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अजित पवार यांना नक्की किती आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे हे अजून समोर आले नाही.
याच सर्व पार्श्वभूमीवर आता एका पोस्टरमुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. एका मनसैनिकाने सेनाभवनाच्या आवारात पोस्टर लावले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे असे साद घालणारे पोस्टर मनसैनिक लक्ष्मण पाटील यांनी लावले आहेत.
(हेही वाचा –मान्सून : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट)
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे असे साद घालणारे पोस्टर मनसैनिक लक्ष्मण पाटील यांनी लावले आहेत. या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो लावण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या राजकरणाचा चिखल झाला…राजसाहेब-उद्धवसाहेब आता तरी एकत्र या…संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे असा मजकूर यात लिहिलं आहे.
सोशल मीडियावर सुद्धा राज-उद्धव यांनी एकत्र यावे अशा अनेक पोस्ट सध्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सध्या हा चर्चेचा विषय ठरत आहे.
त्यामुळे या सगळ्यावर राज ठाकरे कशी प्रतिक्रिया देतात आणि आता हे पोस्टर प्रकरण राजकीय वर्तुळात कसं वळण घेतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community