मनसुख हिरेनच्या हत्येसाठी वाझेने दिले प्रदीप शर्माला ४५ लाख

126
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यात मनसुख हिरेनच्या हत्येसाठी ४५ लाख रुपयांचा सौदा करण्यात आला होता, असे या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

हत्येचा कट पोलीस मुख्यालयात रचला 

रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करणे आणि त्यानंतर त्या  गाडीचा मालक मनसुख हिरेन याची झालेली हत्या, या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी त्यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयात दाखल केला. त्यावर बुधवार, ४ मे रोजी सुनावणी झाली. त्यावेळी एनआयएचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामध्ये मनसुख हिरेन यांच्या हत्येसाठी ४५ लाख रुपयांचा सौदा झाला होता, असा धक्कादायक खुलासा केला. या प्रतिज्ञापत्रात एनआयएने हा हत्येचा कट पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीतच रचला होता, असे म्हटले आहे. तसेच सचिन वाझे याने प्रदीप शर्मा यांना ४५ लाख रुपये दिल्याचे म्हटले आहे. २५ फेब्रुवारी २०२१ रोजी घडलेल्या अँटिलिया स्फोटके प्रकरणातील मनसुख हिरेन हा महत्वाचा साक्षीदार असल्यामुळे तसेच तो या प्रकरणाचा भांडाफोड करेल, या भीतीने ४ मार्च रोजी हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर येथील खाडीत फेकण्यात आला होता. या हत्येचा मुख्य सूत्रधार बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजे असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.