मंत्रालयाच्या इमारतीत बॉम्ब ठेवल्याचा एक निनावी फोन आल्यामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या फोनची गंभीर दखल घेऊन मंत्रालय परिसर व इमारतीची कसून तपासणी करण्यास सुरुवात केली. मंत्रालय उडवून देण्याची धमकी मिळाल्याची मागील 15 दिवसांतील ही दुसरी घटना आहे.
धमकी देणाऱ्याचे नाव बाळकृष्ण ढाकणे असून तो अहमदनगरचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या फोननंतर मंत्रालय व परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. तसेच इमारतीची तपासणीही केली जात आहे. पोलिसांचे श्वान पथक व बॉम्ब शोध पथकही मंत्रालय परिसराची तपासणी करत आहे. या प्रकरणी मंत्रालयात येणाऱ्या वाहनांचीही कसून तपासणी केली जात आहे. दुसरीकडे, पोलिसांची मंत्रालय इमारतीची पाहणी व तपासणी पूर्ण झाल्याचेही वृत्त आहे. तपासणीत पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यामुळे मंत्रालय कर्मचारी व अधिकाऱ्यांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, असे आवाहन करण्यात आले आहे.
(हेही वाचा Metro : मेट्रोच्या कामामुळे मंत्रालयातील काचा फुटल्या; काय आहे प्रकरण?)
Join Our WhatsApp Community