मनुस्मृती म्हणते बलात्काऱ्यांना सोडा; Rahul Gandhi यांच्याकडून मनुस्मृतीचा अवमान 

413
संविधानावर शनिवार, १४ डिसेंबरला लोकसभेत जोरदार चर्चा झाली. त्यावेळी नेहमीप्रमाणे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वीर सावरकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले, तसेच मनुस्मृतीवरही अत्यंत हीन पातळीवर टीका केली. मनुस्मृतीत बलात्काऱ्यांना सोडून द्या, असे मनुस्मृतीत म्हटले आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

काय म्हणाले राहुल गांधी? 

उत्तर प्रदेशात मनुस्मृती लागू होत आहे, तिथे बलात्कार झालेल्या हाथरसमधील पीडित मुलीचे कुटुंब घरात घाबरून बसले आहे आणि गुन्हेगार बाहेर मोकाट आहेत. हे संविधानात कुठे लिहिले आहे, ते तुमच्या मनुस्मृतीत म्हटले आहे. तिथे तुमचे राज्य आहे, तिथे संविधान लागू नाही, तिथे मनुस्मृती लागू आहे, असेही राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले.
द्रोणाचार्याने एकलव्याच्या तो उच्च जातीचा नाही म्हणून अंगठा कापून घेतला. आमची ही अभय मुद्रा आहे, यात आत्मविश्वास आहे, जो एकलव्याच्या अंगठ्यामध्ये आत्मविश्वास होता. द्रोणाचार्यांनी जसा एकलव्याकडून अंगठा कापून घेतला, तसा तुम्ही तुम्ही देशाचा अंगठा कापत आहात. तुम्ही देशातील तरुणांचा अंगठा कापत आहात. जेव्हा तुम्ही अदानी यांना धारावी देता, तेव्हा तुम्ही धारावीतील छोट्या उद्योजकांचे अंगठे कापत आहात. जेव्हा तुम्ही विमानतळ, बंदरे अदानी यांना देता, तेव्हा तुम्ही त्यांचे अंगठे कापून टाकता, असेही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अदानी यांच्यावर टीका करताना महाभारतातील संदर्भ चुकीच्या पद्धतीने वापरले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.