मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपले लक्ष केंद्रित करत आक्रमक भूमिका घेतल्याचे गेल्या दोन ते तीन सभेतून दिसत आहे. तसेच मशिदींवरील भोंग्यांवरून राज ठाकरेंनी महाविकास आघाडीला अल्टिमेटम दिले आहे. गुढीपाडव्याला झालेली सभा, ठाण्याची सभा आणि औरंगाबादमधील सभा या तिन्ही सभेत राज ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारचे वाभाडे काढल्याचे बघायला मिळाले. राज ठाकरेंच्या या सभेनंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपल्या जाहीर सभेची घोषणा केली आहे. १४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही सभा होणार आहे. दरम्यान, काय द्यायचाय तो सवाल जवाब होऊनच जाऊदे असा अशाच मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सांगितले जात आहे.
अशातच आता मुख्यमंत्र्याच्या सभेपूर्वीच मनसेने शिवसेनवर निशाणा साधला असून त्यांना डिवचल्याचे दिसून आले आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या सभेला टोमणे सभा असे म्हणत सेनेच्या या सभेवर निशाणा साधला आहे.
मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी गुरूवारी ट्विट करत प्रशासनाला सवाल विचारला असल्याचे दिसतेय. त्यांनी असे ट्विट केले की, राजसाहेबांच्या संभाजीनगरच्या सभेला अनेक अटी, शर्ती मग शिवसेना पक्षप्रमुखांच्या टोमणे सभेला काही अटी, शर्ती आहेत का ? आमचं सरकार आलं की मशिदींवरील भोंगे,रस्त्यावरील नमाज बंद करणार हे बाळासाहेबांच स्वप्न हिंदुत्वाचा हुंकार म्हणत सभा घेणारे पूर्ण करणार का? असा सवाल उपस्थित केला आहे. इतकेच नाही तर त्यांनी या सभेला टोमणे सभा म्हणत त्या सभेला शुभेच्छा दिल्या आहेत.
(हेही वाचा – शिवसेनेने चोरली राज ठाकरेंच्या सभेची गर्दी)
Join Our WhatsApp Communityराजसाहेबांच्या संभाजीनगरच्या सभेला अनेक अटी,शर्ती मग शिवसेना पक्षप्रमुखांच्या टोमणे सभेला काही अटी,शर्ती आहेत का ?
आमचं सरकार आल की मशिदींवरील भोंगे,रस्त्यावरील नमाज बंद करणार हे बाळासाहेबांच स्वप्न हिंदुत्वाचा हुंकार म्हणत सभा घेणारे पूर्ण करणार का?
बाकी टोमणे सभेला शुभेच्छा.!
— Gajanan Kale (@MeGajananKale) May 12, 2022