राज्यात CM पदाचे अनेक दावेदार; जाणून घ्या ८ मुख्यमंत्र्यांना विचित्र कारणांमुळे सोडावे लागलेले पद

मविआमध्ये मुख्यमंत्री पदाचे (CM) दावेदार बरेच झाले आहेत. उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे नाना पटोले, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागले आहेत.

214

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटप अजून तरी पूर्ण झाले नाही. यात मविआमध्ये मात्र जागा वाटपाचा तिढा अधिक जटिल बनला आहे. कारण मविआमध्ये मुख्यमंत्री पदाचे (CM) दावेदार बरेच झाले आहेत. एका बाजूला उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनाही मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाची लालसा जागा वाटपाच्या चर्चेत अडथळा निर्माण करत आहे. हे मुख्यमंत्री पद मिळवणे आणि टिकवणे किती जिकरीचे असते, हे राज्याच्या इतिहासात ८ मुख्यमंत्र्यांनी अनुभवले, विचित्र कारणामुळे त्यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले होते.

सत्तेच्या हव्यासापोटी बनलेले मुख्यमंत्री ठाकरे अल्पमतात आले 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक भाजपासोबत लढली मात्र निकालानंतर दोन्ही काँग्रेससोबत महाविकास आघाडी बनवून सत्ता स्थापन केली आणि स्वतः मुख्यमंत्री (CM) बनले. मात्र अडीच वर्षांनंतरच शिवसेनेतून एकनाथ शिंदे ४० आमदार फोडून भाजपासोबत गेले. परिणामी मविआ सरकार अल्पमतात आले, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी स्वतःहूनच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.

संतापाने रातोरात बनलेले मुख्यमंत्री फडणवीस अडीच दिवसात थंडावले  

त्याआधी राज्यात शिवसेना दोन्ही काँग्रेससोबत जाऊन सत्ता स्थापन करत असल्याचे लक्षात येताच संतापलेल्या भाजपाने अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे मुख्य नेते अजित पवार यांनी फोडून पहाटेचा शपथविधी केला. अवघ्या अडीच दिवसांसाठी सत्तेत आलेले भाजपा आणि बंडखोर अजित पवारांचे लागलीच कोसळले. अजित पवारांना पाठिंबा देणार असलेले बहुतांश आमदार पुन्हा शरद पवारांना भेटले आणि सरकार कोसळले. अडीच दिवसांच्या या सरकारचे मुख्यमंत्री (CM) देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला होता.

(हेही वाचा Assembly Election : भाजपाची टॅग लाईन ‘बटेंगे तो कटेंगे’ ठिकठिकाणी लागले बॅनर्स)

आमदार अंगावर धावून आल्याने भोसले माघारी फिरले  

बाबासाहेब भोसले हे जानेवारी 1982 ते फेब्रुवारी 1983 दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (CM)  राहिले. बाबासाहेब भोसले हे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जवळचे आणि मर्जीतले मुख्यमंत्री म्हणून ओळखले जायचे. त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ केवळ 13 महिन्यांचा होता. बाळासाहेब भोसले राज्याचे मुख्यमंत्री असताना नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावेळी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत प्रचंड गोंधळ झाला. त्यावेळी काँग्रेसचेच आमदार मुख्यमंत्र्यांच्या अंगावर धावून गेल्याने मुख्यमंत्री चांगलेच संतापले. ‘भाषा बंडाची, वृत्ती गुंडाची आणि कृती षंढाची’ अशा शब्दांमध्ये तेव्हा बाबासाहेब भोसले यांनी अंगावर धावून आलेल्या आमदारांवर टीका केली होते. आमदार अंगावर धावून गेल्याने बाबासाहेब भोसलेंनी चपला टाकून विधिमंडळाच्या बैठकीतून पळ काढावा लागला होता. हिवाळी अधिवेशनाच्या काही दिवसांनंतर त्यांचे मुख्यमंत्रीपद गेले.

सिमेंट घोटाळ्यामुळे अंतुलेंना सोडावी लागली खुर्ची  

बॅरिस्टर ए. आर. अंतुले हे महाराष्ट्राच्या राजकारणात फार चर्चेत असलेले नाव. मात्र सिमेंट घोटाळ्यामुळे अंतुले यांचे मुख्यमंत्री (CM) पद गेले. अंतुले हे राज्याचे सातवे मुख्यमंत्री होते. त्यांनी 9 जून 1980 ते 12 जानेवारी 1982 दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री पद भुषवले होते.

मुलीचे मार्क वाढवल्याने निलंगेकर-पाटलांना सोडावे लागले मुख्यमंत्री पद 

शिवाजीराव निलंगेकर-पाटील यांचे मुख्यमंत्रीपद (CM) तर चक्क मुलीचे मार्क वाढवल्याने गेले. 3 जून 1985 ते 6 मार्च 1986 या कालावधीत मुख्यमंत्री राहिलेले शिवाजीराव हे महाराष्ट्राचे दहावे मुख्यमंत्री होते.

आदर्श घोटाळ्यामुळे चव्हाण भ्रष्ट बनले  

सध्या भाजपामध्ये संसार थाटलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना ‘आदर्श’ घोटाळ्यात झालेल्या आरोपांमुळे मुख्यमंत्रीपद (CM) सोडावे लागले, हुतात्मा जवानांच्या नातलगांची आरक्षित भूखंडावर आदर्श टॉवर उभारल्याचे आरोप झाला.

(हेही वाचा ‘मविआ’तल्या तू तू मैं मैं नंतर काँग्रेसच्या Nana Patole यांना डच्चू; बाळासाहेब थोरातांकडे मोठी जबाबदारी)

जावयाला फायदा दिल्याने जोशींची झाली गोची  

जावयाच्या फायद्यासाठी पुण्यातील जमिनीचे आरक्षण बदलल्याचा ठपका शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री (CM) झालेल्या मनोहर जोशी यांच्यावर ठेवण्यात आला होता. मात्र पद जाण्याआधीच त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी 1995 ते 1999 दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले.

मुंबई हल्ल्यात चुकीचे वर्तन विलासराव देशमुखांना नडले 

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर एका विचित्र वादावरुन तत्कालीन मुख्यमंत्री (CM) विलासराव देशमुख यांना पद सोडावे लागले होते. अभिनेता पुत्र रितेश देशमुख आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांना घेऊन विलासराव देशमुख हल्ला झालेल्या ठिकाणांपैकी एक असलेल्या ताज हॉटेलची ‘पाहणी’ करायला गेल्याचे फोटो समोर आल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आणि त्यातच त्यांचे मुख्यमंत्रीपद गेले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.