आनंद-आश्रम आणि शिवसेना भवन; कोण खरं आणि कोण खोटं?

134

शिवसेना नावारुपाला आल्यानंतर मातोश्री आणि शिवसेना भवन ही त्यांची पवित्र वास्तू राहिलेली आहे. कै. बाळासाहेब ठाकरे यांना शिवसैनिक दैवत मानत असल्यामुळे मातोश्री या बंगल्याला मंदिराचे स्वरुप प्राप्त झाले होते. बाळासाहेबांच्या जन्मदिनी अनेक शिवसैनिक मातोश्री बाहेर उभे राहायचे. शिवसेना भवन देखील शिवसैनिकांसाठी श्रद्धेचं स्थान होतं. एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर अनेक समीकरणे बदलली आहेत.

( हेही वाचा : भाजपा सिरीयल किलर, मग आप सिरीयल डीलर? )

उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडशी युती केल्यामुळे ठाकरेंसोबत राहिलेले शिवसैनिक देखील नाराज आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती केल्यानंतर ही नाराजी सैम्य होती पण आता मात्र या नाराजीने रौद्र रुप धारण केलेलं आहे. शिवसैनिकांना कळत नाही की बाळासाहेबांनी आपल्याला हिंदुत्वनिष्ठ बनवलं आणि ज्यांनी हिंदुत्वाचा कायम उघडउघड द्वेष केला त्यांच्या सोबत कसं बसायचं?

कदाचित एकनाथ शिंदे यांना भविष्य कळलं असावं म्हणूनच त्यांनी उठाव केला आणि बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी आपला एक वेगळा गट स्थापन केला. आता कोणाची शिवसेना खरी आणि कोनाची खोटी हा कायदेशीर पेच सुटायला आणखी काही महिने लागणार आहेत. परंतु शिंदेंनी मात्र आपल्या कृतीद्वारे आपलीच शिवसेना खरी असल्याचे दाखवले आहे.

एकनाथ शिंदे देखील दसरा मेळावा घेणार असल्याचं समोर आलं आहे. हा उद्धव ठाकरेंसाठी खूप मोठा धक्का आहे. पण शिंदेंच्या शिवसेनेने ठाकरे गटाला आणखी एक जबदरस्त धक्का दिला आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालय म्हणून इतकी वर्षे शिवसेना भवनाचा उल्लेख केला जात होता. शिवसेना भवन शिवसैनिकांसाठी खूप महत्वाची वास्तू आहे.

शिंदेंनी मात्र हा पत्ता बदलला आहे. धर्मवीर म्हणून प्रसिद्ध असलेले कै. आनंद दीर्घे यांच्या टेंभी नाका येथे असलेले आनंद आश्रम आता यापुढे शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय असणार आहे. आनंदआश्रमाची दागडुजी करण्याचे काम जोरात सुरु आहे आणि कही दिवसात याचे उद्घाटन देखील होणार आहे. त्यामुळे शिंदे यांनी शिवसैनिकांना हा संदेश दिला आहे की यापुढे शिवसेनेची सूत्र ठाण्यातून हलवली जाणार आहे आणि आनंद दिघे हे त्यांचे श्रद्धास्थान राहणार आहेत.

त्यामुळे आनंदआश्रम की शिवसेना भवन असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. एकनाथ शिंदे यांनी ही खेळी अचानक केलेली नसून यासाठी किमान २ वर्षे योजना आखली असणार. ते उद्धव ठाकरेंकडून त्यांची ओळख हिरावून घेत आहेत असा समज कुणी करु नये तर ते स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात आता शिंदे-पर्व सुरु झालेलं आहे…

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.