आर्यन खानमुळे बॉलिवूडचे अनेकजण एनसीबीच्या रडारवर!

नसीबीने अटक केलेल्या आठही जणांचे मोबाईल फोन ताब्यात घेऊन मोबाईल फोन तपासले जात असताना शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान यांच्या मोबाईल फोनमध्ये धक्कादायक असे छायाचित्रे तसेच व्हाट्सएप चॅट हाती लागले आहे.

98

आर्यन खानच्या मोबाईल फोनमधील चॅटमुळे बॉलिवूड तसेच ड्रग्स पेडलर्स अडचणीत येऊ शकतात. एनसीबीने आर्यनच्या मोबाईलची झाडाझडती सुरू केली असून या व्हाट्सएप चॅटवरूनच गोरेगाव येथून श्रेयस नायरला अटक करण्यात आली आहे. दुसरी क्रूझवरून परतलेल्या पैकी एकाला करण्यात आली आहे. या प्रकरणात एकूण ११ जणांना आतापर्यंत अटक झालेली असून अटकेचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)चे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी अधिकऱ्यासह मुंबईहून गोव्याला निघालेल्या कॉर्डिलिया क्रूझवरील कथित रेव्ह पार्टी शनिवारी उधळून लावली. याप्रकरणी एनसीबीने बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान त्याचा मित्र अरबाज मर्चंट, दिल्लीमधील मॉडेल मूनमून धामेचा यांच्यासह ८ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून काही प्रमाणात अमली पदार्थ आणि रोकड जप्त करण्यात आली होती.

(हेही वाचा : मुख्यमंत्री म्हणाले अर्थसंकल्प ही ठिपक्यांची रांगोळी)

आर्यनच्या मोबाईल फोनमध्ये धक्कादायक छायाचित्रे

आर्यन खानसह ८ जणांना अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस ऍक्ट) अंतर्गत गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. एनसीबीने अटक केलेल्या आठही जणांचे मोबाईल फोन ताब्यात घेऊन मोबाईल फोन तपासले जात असताना शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान यांच्या मोबाईल फोनमध्ये धक्कादायक असे छायाचित्रे तसेच व्हाट्सएप चॅट हाती लागले आहे. आर्यनच्या मोबाईल फोन मध्ये एक व्हाट्सएप ग्रुप मिळून आला असून या ग्रुप मध्ये असलेले मोबाईल क्रमांक अनोळखी आहेत. या ग्रुप मध्ये करण्यात आलेल्या चॅटिंग ही कोडवर्ड वापरून करण्यात आलेली आहे.

आर्यनच्या संपर्कात बॉलिवूड संबंधित तरुण-तरुणी, मॉडेल्सचा सहभाग

आर्यनच्या व्हाट्सएप ग्रूप चॅटची तपासणी सुरू असून त्यातील सर्व अनोळखी क्रमांक कुणाचे आहे, याची माहिती काढण्यात येत आहे. या व्हाट्सएप चॅटवरून एनसीबीने सोमवारी रात्री गोरेगाव येथून श्रेयस नायर या ड्रग्स सप्लायरला अटक केली आहे. तसेच या प्रकरणाशी आर्यनच्या संपर्कात असणाऱ्याची माहिती मिळवून त्यांना चौकशीसाठी बोलावले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एनसीबी सूत्रांच्या म्हणण्यानुसार आर्यनच्या संपर्कात अनेक बॉलिवूड संबंधित तरुण तरुणी, मॉडेल्स असून त्यांचा ड्रग्स प्रकरणाशी काही संबंध आहे का? हे देखील तपासले जाणार आहे. दरम्यान गोरेगाव येथून अटक करण्यात आलेला श्रेयस नायर हा ड्रग्स सप्लायर असून पार्टी, तसेच बड्या धेंड्याना आणि बॉलिवूडमधील अनेकांना तो ड्रग्सचा पुरवठा करीत होता, अशी माहिती समोर येत आहे. नायर याच्या संपर्कात असणारे बॉलिवूड संबंधित तसेच मॉडेल यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येणार असल्याचे एनसीबीच्या सूत्राकडून समजते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.