ख्रिस्ती नवं वर्षाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) हे गडचिरोली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विकासकामांच्या परिस्थितीचा आढावा घेत तेथील पाहणी केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोलीत सी-60 जवानांचा (C-60 Jawaan) सत्कार सोहळा आणि माओवाद्यांचा आत्मसमर्पणाचा (Surrender of Maoists) कार्यक्रम पार पडला. अहेरी ते गरदेवाडा बस स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा धावत आहे. त्या बसचं उद्घाटन आपण केलं. पेनगुंडाला नवीन आऊटपोस्ट सुरु केलं. कोनसरीमध्ये विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं, यामुळं गडचिरोलीला स्टील सिटीचा दर्जा मिळणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. (CM Devendra Fadnavis)
गडचिरोली येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात मागील 38 वर्षांपासून नक्षली चळवळीत सक्रीय असणाऱ्या ताराक्कासह 11 नक्षलवाद्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे (Surrender of 11 Maoists in Gadchiroli) शस्त्रे टाकली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे भारतीय संविधान देऊन स्वागत केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी आज दिवसभर गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. त्यात अनेक महत्त्वाचे कार्यक्रम झाले. सी 60 च्या अधिकाऱ्यांनी सातत्याने विविध चकमकींत शौर्य दाखवत आपले शौर्य दाखवले. त्यांनी अनेक माओवाद्यांना निशस्त्र करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले.
(हेही वाचा – Sports Calendar 2025 : चॅम्पियन्स करंडक, महिला विश्वचषक आणि फिफा क्लब फुटबॉल विश्वचषक, नवीन वर्षातील क्रीडा मेजवानी)
महाराष्ट्रातील माओवाद्यांची भरती पूर्णतः बंद
पोलिसांनी गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद संपवण्याचे काम जवळपास पूर्ण केले आहे. उत्तर गडचिरोली आता माओवाद्यांपासून मुक्त झाली आहे. दक्षिण गडचिरोलीही लवकरच माओवाद्यांपासून मुक्त होईल याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही. पोलिसांनी येथे राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे मागील 4-5 वर्षांत येथील एकही तरुण माओवादी संघटनेत भरती झाला नाही. किंबहुना महाराष्ट्रात माओवाद्यांची भरती पूर्णतः संपुष्टात आली आहे. हे सर्वकाही पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून घडले असून, हे एक अत्यंत मोलाचे कार्य आहे. जनतेचा विश्वास माओवाद्यांवर नाही तर प्रशासनावर, राज्यावर, देशावर व आपल्या संविधानावर वाढत आहे याचे द्योतक आहे. त्यामुळे आता कुणीही संविधान विरोधी चळवळीत जायला तयार नाही हे यातून स्पष्ट होते.
(हेही वाचा – कोकणात जलमार्गांचे जाळे विस्तारणार – Nitesh Rane)
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, माओवाद हा कोणताही विचार नाही,कुठलाही आचार नाही, भारताच्या संविधानावर विश्वास नाही अशा प्रकारच्या लोकांनी अराजकता तयार करण्याकरता हे अभियान उभारलं, सुरुवातीच्या काळात काही लोकं भरकटले. आज जे लोकं या माओवादी गतिविधी आहेत त्यांच्या लक्षात येत आहे, न्याय मिळायचा असेल तर भारतीय व्यवस्थेतून मिळेल, भारतीय संविधानानं तयार केलेल्या संस्थातून मिळेल. विकास पुढे चाललाय तशी माओवादाची (Gadchiroli Maoists) पिछेहाट होताना पाहायला मिळेल. सी-60 आणि केंद्रीय सुरक्षा दलांच्या शौर्यामुळं येत्या काळात माओवाद महाराष्ट्रातून हद्दपार झालेला असेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांची नावं :
विमला चंद्रा सेडाम उर्फ ताराक्का
सुरेश बैसाखी उईके उर्फ चैतू उर्फ बुटी
कल्पना गणपती तोरेम उर्फ भारती उर्फ तोरेम
अर्जुन तानू हिचामी उर्फ सागर उर्फ सुरेश
संम्मी पांडू मट्टामी उर्फ बंडामी
निशा बोडका हेडो उर्फ शांती
श्रृती उलगे हेडो उर्फ मन्ना
शशिकला पथ्थीराम उर्फ श्रृती
सोनी सुक्कू मट्टामी
आकाश सोमा पुंग्गाटी उर्फ वत्ते
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community