महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक लागले, महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला. त्यामुळे विरोधक आता या निवडणुकीत EVM घोटाळा झाल्याचे सांगत त्यांनी मारकडवाडी (Marakadwadi) येथे बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला. कुणाला वाटले म्हणून मतदानाची प्रक्रिया बदलता येत नाही किंवा पुनर्मतदान घेता येत नाही. महाराष्ट्राचा मणिपूर होईल, भारताचा बांगलादेश होईल, बदलापूरचे उद्रेकापूर होईल, छोट्या छोट्या निरर्थक मुद्यावर अराजक माजवण्याचा प्रयत्न होत आहे. हा सगळा जॉर्ज सोरोसच्या एका मोठ्या कटाचा भाग आहे, असा घणाघाती हल्ला ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक डॉ. उदय निरगुडकर यांनी केला.
अराजकतेच्या युद्धाची सुरुवात
‘हिंदुस्थान पोस्ट’ ला मुलाखत देताना डॉ. निरगुडकर हे ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक स्वप्नील सावरकर यांच्याशी बोलत होते. मारकडवाडी (Marakadwadi) हा जॉर्ज सोरोस यांच्या कटाचा छोटासा सुरुंग आहे. त्या सुरुंगामुळे वात पेटते का, जनक्षोभ उसळतो का, याची चाचपणी केली जात आहे. आपण गाडीत ऑइल किती आहे हे बघायला काठी घालून बघतो, तसे एका डीप स्टेटच्या तयारीसाठी मारकडवाडी (Marakadwadi) ही डीप स्ट्रीक आहे. ही लोकशाहीची नांदी नाही, ही अराजकतेच्या युद्धाची सुरुवात आहे. म्हणून याचा कडाडून निषेध व्हायला हवा, असेही डॉ. निरगुडकर म्हणाले.
महराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकल धक्कादायक लागले, यात महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला आहे. मात्र विरोध आता हा निकाल मान्य करायला तयार नाहीत. यात EVM घोटाळा झाल्याचा आरोप विरोधक करू लागले आहे. त्यामुळे निवडणूक बॅलेटपेपर अर्थात मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात, अशी मागणी विरोधक करू लागले आहेत. त्यासाठी मारकडवाडी (Marakadwadi)येथे परस्पर मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याचा घाट घालण्यात आला. त्याला प्रशासनाकडून विरोध झाल्यावर या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांनी भेट दिली, आता काँग्रेस नेते राहुल गांधी या ठिकाणी येणार असल्याची माहिती आहे. मारकडवाडीचे लोण राज्यभर पसरणार आहे, असे जितेंद्र आव्हाड आधीच म्हणाले आहेत. यावरून विरोधकांनी मारकरवाडी (Marakadwadi)येथून लोकशाही प्रणालीला आव्हान देत अराजक माजवण्याचे कारस्थान रचत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व प्रकरणावर डॉ. निरगुडकर यांनी कडक शब्दांत टीका केली.
Join Our WhatsApp Community