Maratha-Kunbi Certificate : मराठा-कुणबी प्रमाणपत्र समिती मराठवाड्याच्या दौऱ्यावर

अध्यक्षांसह समिती सदस्य घेणार जिल्हानिहाय बैठका

133
Maratha-Kunbi Certificate : मराठा-कुणबी प्रमाणपत्र समिती मराठवाड्याच्या दौऱ्यावर
Maratha-Kunbi Certificate : मराठा-कुणबी प्रमाणपत्र समिती मराठवाड्याच्या दौऱ्यावर

कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र (Maratha-Kunbi Certificate) पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष  निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे आणि  समिती सदस्य हे ११  ते २३ ऑक्टोबर २०२३ याकालावधीत छत्रपती संभाजीनगर विभागाचा जिल्हानिहाय दौरा करणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून समितीच्या जिल्हानिहाय दौऱ्याचे वेळापत्रक कळविले आहे.

या दौऱ्याच्या  दरम्यान समितीचे अध्यक्ष आणि  सदस्य कामकाजाच्या अनुषंगाने मराठवाडा विभागातील  सर्व जिल्ह्यांमध्ये बैठक घेणार आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली  पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज आदी  समितीस उपलब्ध करुन देण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

(हेही वाचा-Nitin Gadkari : नितीन गडकरी आता ‘हिरो’ होणार)

समितीची पहिली बैठक छत्रपती संभाजीनगरला  ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे होणार आहे. त्यानंतर १२ ऑक्टोबरला  जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालयात,  १६ ऑक्टोबरला परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात, १७ ऑक्टोबरला  हिंगोली  जिल्हाधिकारी कार्यालयात,  १८ ऑक्टोबरला  नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात, २१ ऑक्टोबरला लातूर  जिल्हाधिकारी कार्यालयात,  २२ ऑक्टोबरला धाराशिव  जिल्हाधिकारी कार्यालत तर  २३ ऑक्टोबरला बीड  जिल्हाधिकारी कार्यालयात समितीची बैठक होणार आहे. समितीच्या सर्व बैठका सकाळी ११ वाजता होणार आहेत.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.