मराठा – ओबीसी (Maratha OBC Reservation) समाजात वाद निर्माण होऊ नये, दोन्ही समाजात सलोखा राहावा, यासाठी मराठा आणि ओबीसी समाजातील काही नेत्यांनी एकत्र येत प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी (२० नोव्हेंबर) मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मराठा – ओबीसी समाजाची बैठक पार पडली.
बैठकीला (Maratha OBC Reservation) संभाजीराजे छत्रपती, ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांच्यासह दोन्ही समाजांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यात ज्या समाजाची जेवढी लोकसंख्या त्यांना तेवढे आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका या बैठकीत मांडण्यात आली.
(हेही वाचा – Amit Shah : भाजप सत्तेत आल्यास मुस्लिम आरक्षण रद्द करू)
मराठा – ओबीसी म्हणजे इंडिया – पाकिस्तानचे लोक नाही
महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, विविध संतांनी संस्कार दिले. अशा राज्यात वातावरण पेटले तर ते राज्याला परवडणारे नाही. त्यामुळे सरकारने आरक्षणाबाबत (Maratha OBC Reservation) लवकर तोडगा काढावा, अशी भूमिका छत्रपती संभाजीराजे यांनी मांडली.
छगन भुजबळांनी अत्यंत खालच्या स्तरावरील भाषण केले. मी भुजबळांना काही वर्षांपूर्वी शाहूंच्या विचारांचे वारसदार म्हणालो होतो, त्याची मला लाज वाटते, अशा शब्दांत संभाजीराजेंनी भुजबळांचा समाचार घेतला. (Maratha OBC Reservation)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community