राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पेटला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालन्यातील आंदोलनाला हिंसक वळण आले आहे. या आंदोलनाचे राज्यभर पडसाद उमटले आहे. जालना पाठोपाठ सोलापूर, औरंगाबाद, नागपूर आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील आंदोलक आक्रमक झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारने आज म्हणजेच सोमवार ४ सप्टेंबर रोजी एक महत्वाची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. ही बैठक दुपारी १२ वाजता सह्याद्रीवर होणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्र मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक ४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
(हेही वाचा –Narayan Rane: मराठा समाजाला न्याय द्या, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मागणी)
या बेठकीला मराठा आरक्षण (Maratha Reservation) मंत्री, उपसमितीमधील सर्व सदस्य मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित रहाणार आहेत. तसेच मराठवाडा विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर, हिंगोली, परभणी, अहमद नगर, जालना, नांदेड, लातूर, या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक असे सर्व वरिष्ठ प्रशासकिय अधिकारी देखील सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्र सरकारने जरांगे पाटील यांना बोलावलं
मराठा आरक्षणासाठी उपोषणाला (Maratha Reservation) बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना देखील महाराष्ट्र सरकारने या बैठकीचे निमंत्रण दिले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीबाबत सरकारी अधिकारी आणि जरंगे पाटील यांच्यात बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
जरंगे हे मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालन्यात उपोषणाला बसले होते. तेव्हा अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केल्यानंतर शुक्रवारी (१ सप्टेंबर) आंदोलनाने हिंसक वळण घेतले. यावेळ पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्याचा प्रकार घडल्याचे पडसाद सध्या राज्यभर उमटत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community