Maratha Reservation : मुख्यमंत्री शिंदे मनोज जरांगे यांना भेटले आणि फडणवीस म्हणाले…

174
Maratha Reservation : मुख्यमंत्री शिंदे मनोज जरांगे यांना भेटले आणि फडणवीस म्हणाले...

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी गेल्या १७ दिवसांपासून उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण आज म्हणजेच गुरुवार १४ सप्टेंबर रोजी अखेर मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन त्यांनी आपलं उपोषण सोडलं. आमरण उपोषण मागे घेतलं असलं तरीही मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर (Maratha Reservation) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करत मराठा समाजाच्या कल्याणकारी योजनांसाठी आमचे सरकार प्रयत्नांची शर्थ करेल असे सांगितले आहे.

(हेही वाचा – Maratha Reservation : अखेर १७ दिवसांनी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे)

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच मंत्रिमंडळातील अन्य सहकार्‍यांच्या उपस्थितीत आज मागे घेतले, ही समाधानाची बाब आहे. मराठा आरक्षणाबाबतीत आम्ही प्रारंभीपासून सातत्याने प्रयत्नरत राहिलो. ते आम्ही दिले आणि हायकोर्टात टिकले सुद्धा. सुप्रीम कोर्टात ते का टिकले नाही, यावर मत व्यक्त करण्याची आज वेळ नाही. मात्र, सारथी, छत्रपती राजर्षि शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उद्योजकतेला प्रोत्साहन, अधिसंख्य पदांची भरती अशा अनेक उपाययोजना अंमलात आणण्यात आल्या. आजही या सर्व बाबतीत अतिशय गतीने काम सुरु आहे. भविष्यात सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात मराठा आरक्षण (Maratha Reservation) तसेच मराठा समाजाच्या कल्याणकारी योजनांसाठी आमचे सरकार प्रयत्नांची शर्थ करेल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.