Maratha Reservation : आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज ही पोलिसांची दादागिरी, फडणवीसांचा यात कुठलाही हात नाही – रामदास आठवले

154
Maratha Reservation : आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज ही पोलिसांची दादागिरी, फडणवीसांचा यात कुठलाही हात नाही - रामदास आठवले

मराठा आरक्षण (Maratha Reservation) या मुद्द्यावरून सध्या राज्यातील राजकारण तापलं आहे. जालन्यातील लाठीमार प्रकरणावरून विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली असून आता रामदास आठवले यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालनामध्ये आंदोलन (Maratha Reservation) सुरु आहे. मात्र काही दिवसांपूर्वी या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. अशातच या आंदोलनाचे राज्यभर पडसाद उमटले आहे. जालना पाठोपाठ सोलापूर, छ. संभाजीनगर, नागपूर आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील आंदोलक आक्रमक झाले आहेत. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज प्रकरणावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं विधान केलं आहे. माध्यमांशी बोलतांना रामदास आठवले म्हणाले, “जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज ही पोलिसांची दादागिरी असून यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कुठलाही हात नाही.”

(हेही वाचा – Maratha Reservation : जालन्यातील आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ कोल्हापूर बंद; सर्व शाळांना सुट्टी जाहीर)

पत्रकार परिषदेत रामदास आठवले पुढे म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आश्वासन दिले होते, आता (Maratha Reservation) मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी ही त्यांची असल्याचेही आठवले यावेळी म्हणाले. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज ही पोलिसांची दादागिरी असून यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा कुठलाही हात नाही. लाठीचार्ज (Maratha Reservation) करण्याचा पोलिसांचा निर्णय हा त्यांनी परस्पर घेतला असून यासाठी सरकारकडून कोणतेही आदेश देण्यात आले नाहीत, असा दावाही रामदास आठवले यांनी केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.