Maratha Reservation: मनोज जरागें पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर, सकल मराठा समाजाच्या वतीने सभांचे आयोजन

मराठा समाजाच्या आचारसंहितेनुसार ही सभा होणार आहे.

121
Maratha Reservation: मनोज जरागें पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर, सकल मराठा समाजाच्या वतीने सभांचे आयोजन
Maratha Reservation: मनोज जरागें पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर, सकल मराठा समाजाच्या वतीने सभांचे आयोजन

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा मराठा समाज गाठी भेट दौरा गुरुवारपासून सुरू होणार आहे. ते सातारा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांनी सरकारला २४ डिसेंबरची मुदत दिली आहे. आता या पार्श्वभूमीवर ते महाराष्ट्र दौऱ्याचा ३रा टप्पा सुरू करणार आहेत. (Maratha Reservation)

जरांगे- पाटील यांच्या कराड येथील सभेला कराड पाटण तालुक्यांसह जवळच्या कडेगाव, शिराळा, सातारा, खटाव तालुक्यांतील एक लाखांहून अधिक मराठा बांधव-भगिनी येतील, असा विश्वास विश्वास समन्वयकांनी व्यक्त केला. १७ नोव्हेंबरला रात्री ७ वाजता छत्रपती शिवाजी स्टेडियमवर त्यांच्या जाहीर सभेचे कराड- पाटण सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजन केले आहे. मराठा समाजाच्या आचारसंहितेनुसार ही सभा होणार आहे. सभेसाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. सभेला उच्चांकी गर्दी व्हावी, यासाठी संबंध प्रयत्न सुरू केले आहेत. या सभेचे आयोजन कराड व पाटण तालुका मराठा समन्वयक समितीने केले आहे. २३ नोव्हेंबरपर्यंत या सभा होणार आहेत.

(हेही वाचा – Indian Army: जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला, २ दहशतवाद्यांचा खात्मा )

जरांगे – पाटील यांच्या सभेसाठी येताना कराडमधील सर्व बंधू भगिनी पायी चालत येणार असून आपल्या परगावाहून येणाऱ्या बांधवांच्या वाहनांना पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देणार आहेत. त्यांच्या सांगली दौऱ्यातील सभेला कराड, पाटण, सातारा, खटाव, कडेगाव, शिराळा तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांच्याशी मराठा समन्वयकांची बैठक झाली. या बैठकीत सुरक्षा, पार्किंग व अन्य वाहतुकीच्या विषयासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.