Maratha Reservation: मनोज जरांगेंनी अमोल कोल्हे आणि बजरंग सोनावणे यांना सुनावलं!

170
Maratha Reservation: मनोज जरांगेंनी अमोल कोल्हे आणि बजरंग सोनावणे यांना सुनावलं!
Maratha Reservation: मनोज जरांगेंनी अमोल कोल्हे आणि बजरंग सोनावणे यांना सुनावलं!

राज्यातील मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा झाला आहे. अशात ओबीसी आरक्षणातून सगे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसह मराठा आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केली आहे. तसंच अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि बजरंग सोनावणे (Bajrang Sonavane) विधीमंडळाच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. संसदेतही हा मुद्दा चर्चिला गेला. जातनिहाय जनगणना व्हावी आणि कुठल्याही समाजाचं आरक्षण न काढता मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं अशी मागणी खासदार अमोल कोल्हेंनी केली होती.

(हेही वाचा –पैशानेच नाही तर पक्षाची मत न पटल्याने देखील मत फुटतात – Ganesh Naik)

मनोज जरांगे यांनी या प्रकरणी बजरंग सोनावणे आणि अमोल कोल्हे यांच्यावर चांगलीच टीका केली आहे. काही तृप्त आत्मे आपल्यात आहेत जे अभ्यासक आहेत, समन्वयक आहेत. या लोकांना समाजासाठी मी जे काम करतो आहे आहे ते बघवत नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. संसदेत खासदार अमोल कोल्हे आणि बजरंग सोनावणेंनी जी भूमिका घेतली त्यावरुन मनोज जरांगेंनी संताप व्यक्त केला आहे.

(हेही वाचा –“विधानपरिषदेच्या निवडणुकीत राजकीय भूकंप झाला तर…” Raosaheb Danve काय म्हणाले?)

“मराठ्यांची मतं घेईपर्यंत गोड बोलायचं, मतं घेतली की जात जागी होते यांची. आमच्या मराठ्यांना हेच कळलं नाही. आता मात्र मराठ्यांचे डोळे उघडले आहेत असं म्हणत मनोज जरांगेंनी अमोल कोल्हेंना टोला लगावला आहे. तसंच एखाद्याला मराठ्यांनी खासदार केलं, मग तो बदलला. पाच वर्षांसाठी त्याला वाटत असेल की आता मला काही धोका नाही. पण आमदारकीला त्यांच्या जिवावार कोणीतरी उभं करतीलच, त्याला मराठे पाडतील.” असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. मनोज जरांगेंनी नाव न घेता बजरंग सोनावणेंवर ही टीका केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.