मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) विशेष अधिवेशनाचा घाट कशाला घालताय? आहे त्याच अधिवेशनात चार दिवस वाढवून घ्या आणि आरक्षण द्या, २४ डिसेंबरनंतर १ तासही वाढवून देणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.
अनेकदा मुदत वाढवून दिली, आम्ही येडे आहे का?
मनोज जरांगे म्हणाले की, हे सरकार विशेष अधिवेशनाच्या नावाखाली वेळकाढूपणा करण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष अधिवेशनाचा घाट घालून वेळकाढूपणा करू नका. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता आम्ही त्यामध्ये बसतोय, बाकी कशातून आरक्षण (Maratha Reservation) दिले तर ते टिकणार नाही. त्यामुळे बाकी आरक्षण देऊन सरकारने मराठ्यांची फसवणूक करू नये. विदर्भातील मराठे आणि मराठवाड्यातील मराठ्यांचे संबंध आहेत, पश्चिम महाराष्ट्रातील मराठे नातेवाईक आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व मराठे एकच आहेत. सध्या आरक्षण हा एकच विषय आहे, त्यामुळे आपापसातील मतभेद बाजूला सारावे आणि मराठा आरक्षणासाठी एकत्र यावे, असेही जरांगे म्हणाले.
Join Our WhatsApp Community