Maratha Reservation : मराठ्यांचा पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयावर मोर्चा

168

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून राजकारण चांगलेच स्थापना आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला साथ देण्यासाठी राज्यभरातील कानाकोपऱ्यात उपोषणा केली जात आहेत. पिंपरी चिंचवड शहरात देखील मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक ठिकाणी साखळी उपोषण आणि आमरण उपोषण केले जात आहे. आज शहरातील मोठ्या संख्येने मराठा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून तहसील कार्यालयावर मोर्चा काढत मराठा आरक्षणाची मागणी केली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये मराठा समाजाने आज मोर्चा काढला आहे. आकुर्डीच्या खंडोबा माळ मंदिरातून या मोर्चाची सुरुवात झाली. तिथून निगडीच्या तहसील कार्यालयावर हा मोर्चा पोहचला. तिथं मराठा बांधवांनी ठिय्या मांडला अन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार वेळकाढूपणा करत आहे. त्याच सरकारला जागं करण्यासाठी मराठा समाज वेगवेगळ्या पद्धतीने आवाज उठवत आहेत.तसेच पिंपरी चिंचवड शहरातील आमदार, खासदार यांनी देखील मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा उपस्थित करावा अशी भुमिका घेतली आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरात राजकिय पक्षांचा कोणताही कार्यक्रम घेऊन देणार नसल्याचे म्हटले आहे.

(हेही वाचा Air Pollution In Mumbai : फटाके फोडण्यावर पालकमंत्री स्पष्ट बोलले, म्हणाले फटाके फोडा, पण…

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.