Maratha Reservation Ministers Conflict : मराठा आरक्षण विषयावर विधानसभेत मंत्र्यांमधीलच जातिप्रेम उघड

यापूर्वी भुजबळ यांनी मंत्रिपदी असताना ओबीसी समाजाच्या जाहीर मेळाव्यांतून भाषणे केली आहेत.

245
Maratha Reservation Ministers Conflict : मराठा आरक्षण विषयावर विधानसभेत मंत्र्यांमधीलच जातिप्रेम उघड
Maratha Reservation Ministers Conflict : मराठा आरक्षण विषयावर विधानसभेत मंत्र्यांमधीलच जातिप्रेम उघड

महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील समजल्या जाणाऱ्या राज्याच्या विधिमंडळात बुधवारी (१३ डिसेंबर) मंत्र्यांमधीलच जातिभेद उघडकीस आला. शिंदे सरकारमधील मंत्री आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ आणि दुसरे मंत्री शंभूराज देसाई (मराठा) यांच्यातील विसंवाद सभागृहात दिसून आला. (Maratha Reservation Ministers Conflict)

यापूर्वी भुजबळ यांनी मंत्रिपदी असताना ओबीसी समाजाच्या जाहीर मेळाव्यांतून भाषणे केली आहेत. तर देसाई यांनी मंत्री असूनही वेळोवेळी मराठा समजाच्या आरक्षणाला जाहीर पाठिंबा दर्शवून, समाजाची बाजू मांडली आहे. (Maratha Reservation Ministers Conflict)

विधानसभेत बुधवारी मराठा आरक्षण विषयावर चर्चा सुरु असताना मंत्री भुजबळ हे बोलण्यासाठी उभे राहताच उबाठा गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप घेत कोणत्या विषयावर भुजबळ बोलणार आहेत असा मुद्दा उपस्थित केला. (Maratha Reservation Ministers Conflict)

(हेही वाचा – पुण्यातील लोकसभेची पोटनिवडणूक त्वरीत घ्या; Bombay High Courtचा आदेश)

त्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण देत मंत्री असले तरी त्यांना विधानसभा सदस्य म्हणून चर्चेत सहभागी होण्याचे अधिकार आहेत असे सांगितले. आणि महाविकास आघाडीच्या काळातही अशी संधी मंत्र्यांना दिल्याचे सांगून विरोधी पक्षाला गप्प केले. (Maratha Reservation Ministers Conflict)

अखेर भुजबळ यांनी बोलण्यास सुरुवात करताच त्यांच्या मागच्या बाकावर बसलेले मंत्री शंभूराज देसाई उभे राहिले आणि “इतर मंत्र्यांनादेखील हाच नियम असेल ना?” असा प्रश्न केला. त्यावर अध्यक्षांनी “सगळ्या मंत्र्यांच्या वतीने भुजबळ बोलतील का?” असा प्रश्न केला तेव्हा तात्काळ, ”नाही.. नाही.. नाही.. नाही.. आम्हाला वेगळं बोलायचं आहे.. भुजबळ साहेबांना संधी दिली तशी संधी आम्हालाही मिळावी,” असा मुद्दा देसाई यांनी मांडला. (Maratha Reservation Ministers Conflict)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.