Prakash Solanke : घराची जाळपोळ केल्यावर काय म्हणाले आमदार प्रकाश सोळंके?

161

माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांच्या वाहनांची जाळपोळ करत घर पेटवल्याची घटना घडली. यानंतर आता आमदार सोळंके यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. “माझ्या घरावर हल्ला करणारे समाजकंटक होते. त्यामध्ये काही स्थानिक अवैध धंदा करणारे लोकं होती. तसेच माझे घर जाळल्याच्या घटनेनंतर मराठा कार्यकर्त्यांनीच माझा जीव वाचवला. ज्यांनी मला संरक्षण दिलं, ज्यांनी माझा जीव वाचवला ते 100 टक्के मराठा समाजाचे लोकं होती”, असे प्रकाश सोळंके यांनी सांगितले.

राज्यात दोन महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा विषय सुरू आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील 2011 पासून काम करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मी आणि माझे कुटुंबीय त्यांच्या आंदोलनात सहभागी आहोत, पण 30 ऑक्टोबरला माझ्या घरावर हल्ला करण्यात आला. 200 ते 300 जण तयारीनेच आले होते. त्या समाजकंटकांनी दगडफेक करत माझे घर जाळले. या समाजकंटकांकडे पेट्रोल बॉम्ब आणि मोठे दगड होते. हे सर्वजण प्लॅनिंग करून आले होते. हा एक पूर्वनियोजित कट होता, असा गौप्यस्फोट प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी केला.

(हेही वाचा Income Tax Returns : आर्थिक वर्षात 31 ऑक्टोबरपर्यंत 7.85 कोटी विक्रमी प्राप्तिकर परतावे दाखल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.