Maratha Reservation : आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन; मंत्रालय प्रवेशद्वाराला ठोकले टाळे

मराठा समाजाच्या आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापले असताना सर्वपक्षीय आमदारांनी बुधवारी मंत्रालय आणि विधानभवनात येथे आरक्षणासाठी लक्षवेधी आंदोलन केले.

113
Mantralay Internship : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी

मराठा समाजाच्या आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापले असताना सर्वपक्षीय आमदारांनी बुधवारी (०१ नोव्हेंबर) मंत्रालय आणि विधानभवनात येथे आरक्षणासाठी लक्षवेधी आंदोलन केले. मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशा घोषणा देत आमदारांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकले. तर विधानभवनाच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) आमदारांनी आंदोलन केले. (Maratha Reservation)

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सह्याद्री अतिथीगृह येथे सर्वपक्षीय बैठक सुरु असताना या आमदारांनी आज सकाळी मंत्रालयात आंदोलन केले. आरक्षणावर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा, अशी मागणी करत या आमदारांनी मंत्रालय प्रवेशद्वाराला टाळे ठोकले. त्यामुळे मंत्रालय सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांची धावपळ उडाली. या आंदोलनात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या राहुल पाटील, कैलास पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित अजित पवार गटाचे दिलीप बनकर, माणिकराव ठाकरे, नीलेश लंके, राजू नवघरे, चेतन तुपे, शेखर निकम, बाबासाहेब पाटील, विक्रम काळे, सुनील शेळके तर काँग्रेसचे मोहनराव हंबर्डे सहभागी झाले होते. (Maratha Reservation)

(हेही वाचा – Mumbai-Pune Expressway : मुंबई – पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, द्रुतगती मार्गावर पुन्हा ब्लॉक)

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, रोहित पवार आत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या आमदार नरेंद्र दराडे, विलास पोतनीस, प्रकाश फातर्पेकर आणि अजय चौधरी यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी केली.या आमदारांनी यावेळी मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली. दरम्यान, राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे गृहखात्याचे अपयश असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज एक्सवर पोस्ट टाकून केली. (Maratha Reservation)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.