Maratha Reservation : राष्ट्रवादीकडून फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी; भाजपने केला पलटवार

133
Supriya Sule यांनी Devendra Fadnavis यांच्यावर टीका केली अन् अंगलट आली...
Maratha Reservation च्या मुद्द्यावरून राज्यभर वातावरण तापले आहे, ठिकठिकाणी जाळपोळ सुरू झाली आहे, या परिस्थितीला गृहमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारणीभूत आहेत, असे सांगत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. त्यावर भाजपने जोरदार पलटवार केला.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? 

Maratha Reservation वरून महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था दीड-दोन महिन्यांपासून ढासळली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. जालन्यात महिला आणि मुलांवर अमानुषपणे लाठीहल्ला गृहमंत्रालयाकडून करण्यात आला. कोयता गँग, ड्रग माफिया, मराठा, मुस्लीम आणि लिंगायत समाजाचे आरक्षण, अशा प्रश्नांवर सरकार अतिशय असंवेदनशील आहे. हे सगळे सरकारसह गृहमंत्रालयाचे अपयश आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे. धनगर समाजाला पहिल्या मंत्रीमंडळ बैठकीत आरक्षण देऊ, असे फडणवीस आमच्या घराबाहेर येऊन म्हणाले होते. १० वर्षापासून गल्ली ते दिल्ली भाजपचे सरकार आहे. पण, आरक्षण दिले नाही, अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

काय म्हणाले भाजप? 

सुप्रिया सुळे तुम्हाला सध्या जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी देवेंद्र फडणवीसच दिसत आहेत. काय करणार सध्या तुम्हालाही दुसरा उद्योग नाही. ज्या देवेंद्र फडणवीस यांनी  Maratha Reservation दिले. उच्च न्यायालयात कायम राहिले. पण, तुमच्या महाआघाडीच्या आणि त्या सरकारचे पालक शरद पवार यांच्या नाकर्तेपणामुळे ते पुढे टिकले नाही. तो विषय आता जुना झाला. काहीही घडले की देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागायचा, हा उद्योग आता बंद करा आणि आपला उरला सुरला पक्ष कसा टिकेल ते पहा, असा सल्ला भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सुप्रिया सुळे यांना दिला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.