Maratha Reservation: ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनाच आरक्षणाचा लाभ मिळणार, देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

मराठा आरक्षणाचा मुद्दा हा सुटला असून अत्यंत चांगला मार्ग काढल्याने या आंदोलनाची सांगता झाल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

272
Maratha Reservation: ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनाच आरक्षणाचा लाभ मिळणार, देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण
Maratha Reservation: ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनाच आरक्षणाचा लाभ मिळणार, देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

मराठ्यांना सरसकट आरक्षण दिले जाणार नाही. ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांनाच आरक्षण मिळणार असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे तसेच त्यांच्या रक्तातील नात्यातल्या लोकांना त्या आरक्षणाचा आणि नोंदीचा लाभ घेता येईल, मात्र ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत. त्या मराठ्यांना आरक्षण दिले जाणार नसल्याचे फडणवीसांनी सांगितले.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिंदेंच्या नेतृत्वात तोडगा काढण्यात आला. या निर्णयाचा मला अत्यंत आनंद आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा हा सुटला असून अत्यंत चांगला मार्ग काढल्याने या आंदोलनाची सांगता झाल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्याने फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही कौतुक केले आहे.

(हेही पहा – Maratha Reservation: मराठा आंदोलनात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा )

मनोज जरांगेंचे अभिनंदन ! 
त्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कायद्याच्या चौकटीत राहून जे आरक्षण मिळू शकतं, त्याच आरक्षणाची मागणी मनोज जरांगे-पाटील यांच्याकडून करण्यात आली होती. सरकारने काढलेला अध्यादेश मनोज जरांगेंनी स्वीकारल्याने त्यांचेही अभिनंदन करण्यात आले.

भुजबळांचा आक्षेप ही फक्त कार्यपद्धती…
भुजबळांचा आक्षेप ही एक कार्यपद्धती आहे, मात्र ओबीसींवर कुठलाही अन्याय होईल, असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. मराठा बांधवांना नोंदी नसल्याने आरक्षण मिळण्यास रस्ता मोकळा केला. त्यांना आरक्षण मिळण्याची जी कार्यपद्धती क्लिष्ट होती. ती सोपी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, मात्र मराठ्यांकडे नोंदी नाहीत, त्यांना आरक्षण दिले जाणार नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.